शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मोठा दिलासा; कस्टम्सकडे सोपवलेल्या कोट्यवधीच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 1:26 PM

नेपाळ, बांगलादेश सीमेवर कस्टम्सकडे सोपविलेल्या कांद्याच्या निर्यातीचा मार्गही यामुळे मोकळा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

योगेश बिडवई

मुंबई - केंद्र सरकारने १४ सप्टेंबरपासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरी ज्या निर्यातदरांनी त्या दिवसापर्यंत निर्यात करण्याचे त्यांचे कांद्याचे साठे बंदरांमध्ये आणून तपासणीसाठी कस्टम्स विभागाकडे सुपूर्द केले होते त्यांना ही बंदी लागू होणार नाही, असे विदेश व्यापार महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे. 

नेपाळ, बांगलादेश सीमेवर कस्टम्सकडे सोपविलेल्या कांद्याच्या निर्यातीचा मार्गही यामुळे मोकळा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. निर्यातबंदीची अधिसूचना प्रसिद्द झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी केंद्रीय सीमाशुल्क मंडळाने (सेंट्रल कस्टम्स बोर्ड) यासंबंधी खुलासा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार खुलासा करणारा ई-मेल निर्यात व्यापार महासंचालनालयातील एक उप महासंचालक (निर्यात) नितिश सुरी यांनी कस्टम्स बोर्डास शुक्रवारी पाठविला आहे. त्यात मालाच्या निर्यातीची तारीख कोणती धरावी यासंबंधीच्या नियमाचा हवाला देऊन असे नमूद करण्यात आले की, ज्यावेळी धोरणात केलेला बदल निर्यातदारांना प्रतिकूल असेल तेव्हा हे सुधारित धोरण, ज्यांनी सुधारित अधिसूचना निघण्याच्या तारखेपर्यंत आपला निर्यातीचा माल बंदरांमध्ये आणून तपासणीसाठी कस्टम्स विभागाकडे सुपूर्द केला आहे, त्यांना लागू होणार नाही. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणारी अधिसूचना ज्या तारखेला प्रसिद्ध झाली तोपर्यंत वरीलप्रमाणे बंदरांमध्ये आणून कस्टम्सकडे सुपूर्द केलेला कांदा हा ‘निर्यातीच्या प्रक्रियेत असलेला माल’ ठरत असल्याने अशा कांद्याला ही निर्यातबंदी लागू होणार नाही. त्यामुळे कस्टम्स मंडळाने बंदरांमधील त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना अशा प्रकारे निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या कांद्याच्या निर्यातीस आडकाठी करू नये, असेही विदेश व्यापार संचालनालयाला कळविले आहे.

बंदरांवर अडकलेल्या 35 हजार टन कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा 

मुंबईचे जेएनपीटी बंदर, दक्षिणेकडीले बंदरे, नेपाळ व बांगलादेश सीमेवर निर्यातीच्या प्रतिक्षेत असलेला कांदा यामुळे परदेशात पाठविता येणार आहे. मुंबईच्या जेएनपीटी बंदरावर फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र तयार असलेला, लोडिंग, पॅकिंग केलेले कंटनेर यामुळे पाठविता येणार आहेत. 

100 कोटींचा कांदा 

मुंबई बंदरावर 350 कंटेनर सोमवारपासून थांबले आहेत. दक्षिणेत बंदरांवर 100 कंटेनर, सीमेवर सुमारे 200 ट्रक कांदा निर्यातबंदीमुळे अडकला होता. हा सुमारे 35 हजार टन म्हणजे 100 कोटींचा कांदा आहे. तो सर्व निर्यात होतो का, हे पाहावे लागेल. 

- अजित शाह, अध्यक्ष, अखिल भारतीय कांदा निर्यातदार संघटना

 

टॅग्स :onionकांदाMaharashtraमहाराष्ट्र