शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमा, मॉलमध्ये गर्दी करणाऱ्यांनी झळ सोसावी!

By admin | Updated: October 1, 2015 03:17 IST

एकीकडे राज्यातल्या काही भागात दुष्काळ आहे. लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत तर दुसरीकडे सिनेमा, मॉलमध्ये गर्दी दिसते.

अतुल कुलकर्णी, मुंबईएकीकडे राज्यातल्या काही भागात दुष्काळ आहे. लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत तर दुसरीकडे सिनेमा, मॉलमध्ये गर्दी दिसते. त्यामुळे अशा वर्गावर दुष्ळाळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून तात्पुरत्या स्वरूपातला अधिभार लावा, अशी सूचना महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे.बाहुबलीसारख्या सिनेमाने ५०० कोटींचा गल्ला जमवला. अनेक चित्रपट १०० कोटींचा गल्ला अवघ्या चार दिवसांत गोळा करतात. लोक अशा चित्रपटांना गर्दी करतात म्हणूनच हे शक्य होते. त्यामुळे चित्रपट तिकिटांवर फार नाही तर किमान १० रुपये जादा अधिभार आकारून लक्झरी गोष्टींवर सुद्धा असा अधिभार लावावा. तसेच तीन व पाच तारांकित हॉटेलांत जाणाऱ्यांवर काही काळासाठी कर लावा, आदी सूचना आपण केल्याचे खडसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मध्यंतरी ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटासाठी सलमान खानची बहीण आणि चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान आपल्याकडे आले होते. त्यांनी चित्रपट करमुक्त करा आणि जेवढा कर सरकारला मिळणार होता तेवढी रक्कम आम्ही मुख्यमंत्री निधीला धनादेशाद्वारे देऊ, असा प्रस्ताव दिला होता. असे करण्याचे कारण काय, असेही त्यांना आपण विचारले होते तेव्हा आपला चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहावा यासाठी आपण हे करीत आहोत, असे त्यांनी सांगितले होते. मात्र त्याच काळात सलमान खानने याकूब मेननच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले आणि त्याचा चित्रपट सरकार टॅक्स फ्री करीत असल्याचे सांगत वादंग उभे केले गेले. परिणामी मुख्यमंत्री निधीत काही कोटी रुपयांची भर पडण्याची राहिली, असा गौप्यस्फोटही खडसे यांनी केला.विदेशी मद्यावर जास्तीचा कर लावला तर शेजारील राज्यातून तस्करी होऊ शकते किंवा हातभट्टीच्या दारूकडे लोक वळतात. अशा मद्याच्या किमती आटोक्यात येतात त्यावेळी विक्री वाढते. याचा अर्थ लोक दारू जास्त पितात असे नाही तर हातभट्टीची दारू लोक पित नाहीत, असे गणितही खडसे यांनी मांडले.