शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

By admin | Updated: May 24, 2014 02:57 IST

लग्नाचे आमिष दाखवून दलित तरुणीची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिक्षकासह पाच व्यक्तींवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून दोन जणांना अटक केली आहे

नवी मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून दलित तरुणीची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिक्षकासह पाच व्यक्तींवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून दोन जणांना अटक केली आहे. वाशी येथील मुलींच्या वसतिगृहात राहणार्‍या दलित तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. मूळची सांगली येथील शिराळा तालुक्यातील ही मुलगी आहे. याच जिल्ह्यातील बेजेगावातील सुमित पाटणकर या शिक्षकासोबत २०१२ पासून तिचे प्रेमसंबंध होते. यावेळी सुमित याने लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा शारीरिक संबंध ठेवले होते. काही महिन्यांपूर्वी ही तरुणी पुढील शिक्षणास नवी मुंबईत आली होती. कोपरखैरणे येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ती वाशी येथील मुलींच्या वसतिगृहात रहात होती.काही दिवसांपूर्वी सुमित हा देखील नोकरीनिमित्ताने त्याच कॉलेजमध्ये आला होता. त्यामुळे पुन्हा त्यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. या दरम्यान सुमित याने या मुलीला पुणे येथे नेऊन आई, वडिलांची भेट करून दिली. मात्र मुलगी दलित असल्याने घरच्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला. तसेच सुमितचे वडील, आर्ई, काका, बहीण व भावोजी यांनी सदर मुलीला शिवीगाळ करत मारहाण केली. हा प्रकार मुलीने वडिलांना सांगताच त्यांनी देखील मुलाच्या घरी जाऊन लग्नाची विनंती केली. परंतु पोलीस कर्मचारी असलेल्या मुलीच्या वडिलांनाही सुमितच्या कुटुंबीयांनी शिवीगाळ केली. सुमित हा पीडित मुलगी राहत असलेल्या वाशी येथील ठिकाणी येऊन तिला त्रास देत होता. त्यामुळे पीडित तरुणी घर सोडून निघून गेली. अखेर सातारा येथून पोलिसांनीच या मुलीला घरी आणले. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीनुसार वाशी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पीडित व तिच्या वडिलांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सुमितचे वडील रत्नकांत पाटणकर, आई, काका, बहीण आणि भावोजी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुमित व त्याच्या वडिलांना अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पाठारे यांनी सांगितले. या दोघांनाही सीबीडी न्यायालयाने २८ मेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)