शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा बुधवारी निकाल, ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर 'सर्वोच्च' सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 00:44 IST

Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Shivsena: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता न्या.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायमूर्तींचे घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Shivsena: महाराष्ट्रात सुरू असलेला शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट हा शिवसेनेतील संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे. या प्रकरणी विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता न्या.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायमूर्तींचे घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांनी हे पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ गठन केले आहे.  यात न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. नरसिंहा यांचा समावेश आहे. 

'शिवसेना नक्की कोणाची?', या वादाबद्दल शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरात लवकर निर्णयाची अपेक्षा असल्याने, या संदर्भात सुप्रीम कोर्टाने तत्काळ सुनावणी घ्यावी अशी मागणी शिंदे गटाने केली होती. निवडणूक आयोगावरील सुनावणीसाठी टाकलेले निर्बंध काढून टाकावेत, अशी विनंती करणारी याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याचीही मागणी शिंदे गटाकडून कऱण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत उदय लळीत यांनी सूचक संकेत दिले होते. 

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्णय देण्याची घाई करू नये, अशी विनंती केली होती. पण निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे कोर्टाने आदेश द्यावेत, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. इतर प्रकरणांवरील सुनावणी होईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. मात्र कोर्टाच्या निर्णयाआधीच शिवसेना पक्षाविषयीचा निर्णय लावण्यात यावा असे शिंदे गटाचे मत आहे. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत तीन न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले. या प्रकरणी २५ ऑगस्ट रोजी घटनापीठ स्थापन होणार होते, अखेर ते स्थापन झाले.     

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय