शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
4
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
5
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
6
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
7
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
8
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
9
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
10
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
11
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
12
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
13
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
14
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
15
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
16
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
18
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
19
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
20
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
Daily Top 2Weekly Top 5

“बाबासाहेबांचे नाव अनावधानाने राहिले असेल, पण आता एवढे कशासाठी?”; गिरीश महाजनांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 11:05 IST

Girish Mahajan News: मला खूप वाईट वाटले. मी संघाच्या मुशीत वाढलो आहे. आता अनवधानाने राहिले असेल नाव घेणे, पण एवढे कशासाठी? अशी प्रश्न गिरीश महाजन यांनी केला.

Girish Mahajan News: मी दिलगिरी व्यक्त केली. बाबासाहेब यांचे विचार जपणारा आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. मला माहिती नाही की, त्या भगिनी कोण आहेत? मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवणाला बसतो, जामनेरमध्ये सर्व नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य निवडून येतात, यात सर्व समाजाचा वाटा आहे. आम्ही शाम बडोदे यांना जळगावातून तिकीट दिले, हे आमचे सर्वसमावेशक राजकारण आहे, असे भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यावरून सुरू असलेल्या टीकेवर बोलताना गिरीश महाजन यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

बाबासाहेबांसाठी सरकारी नोकरी पणाला, मंत्री गिरीश महाजनांना आव्हान देणाऱ्या माधवी जाधव कोण?

देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अशातच नाशिकमध्ये मात्र खळबळजनक प्रकार घडल्याचे समोर आले. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केले. पंरतु, आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्यावरून वन विभागातील माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्याने थेट जाब विचारला. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपही झाले. विरोधकांनी या घटनेनंतर भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. यावर गिरीश महाजन यांनी सविस्तर भाष्य केले.

संघाच्या मुशीत वाढलो, ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणता, पण कशासाठी?

मला खूप वाईट वाटले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी पुढाकार घेतो. नेते येतात हार घालून निघून जातात. पण मी आमच्या गावात, तालुक्यात जयंतीमध्ये असतो. मी चाळीस वर्षांत एकदाही असे केले नाही. मातंग समाजासाठी, वाल्मिकी समाजासाठी जातो, लग्नात जातो. मी संघाच्या मुशीत वाढलो आहे. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा उभा केला. आता अनवधानाने राहिले असेल पण एवढे कशासाठी? मी चाळीस वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही असे कधी झाले का? ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणताय, पण कशासाठी? अशी विचारणा गिरीश महाजन यांनी केली.  महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणे हा भाजपचा संस्कार आहे. आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सलग ४० वर्षांपासून दरवर्षी आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो, लेझीम खेळतो. आंबेडकरी विचार आमच्या केवळ भाषणात नाही, तर प्रत्यक्ष कृतीतही आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचा जो अपमान केला आहे, तो भरून निघण्यासारखा नाही. कुंभमेळ्यात नदीत आंघोळ केली, तरी त्यांचे पाप धुतले जाणार नाही. संविधानाच्या मार्गानेच त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होईल, तेव्हाच ते पाप धुतले जाईल. गिरीश महाजनांवर अॅट्रॉसिटी दाखल करावी. अन्यथा याच ठिकाणी मी उपोषण सुरू करणार आहे, असा थेट इशारा माधवी जाधव यांनी दिला आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Girish Mahajan defends not mentioning Ambedkar's name; faces criticism.

Web Summary : Girish Mahajan apologized for unintentionally omitting Dr. Ambedkar's name during a speech. He emphasized his respect for Ambedkar's ideals and commitment to social inclusivity, refuting allegations of deliberate disrespect. A woman threatened action, demanding an apology.
टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२६Girish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाState Governmentराज्य सरकारforestजंगलforest departmentवनविभागDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरPoliticsराजकारण