शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

फक्त बोलून अंतरंग भगवं होत नाही; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 13:59 IST

राज ठाकरेंचं कौतुक; उद्धव ठाकरेंचा तिखट शब्दांत समाचार

मुंबई: बाळासाहेब ठाकरेंचे विचार विसरलेली शिवसेना पुढील निवडणुकांमध्ये कुठेही दिसणार नाही, अशी घणाघाती टीका भाजपाचे आमदार नितेश राणेंनी केली आहे. बाळासाहेबांचा वारसा मनसे प्रमुख राज ठाकरेच पुढे नेऊ शकतील. राज यांची वैचारिक भूमिका हिंदुत्ववादीच असल्यानं त्यांनी काल मांडलेल्या विचारांचं आश्चर्य वाटलं नाही, असंदेखील नितेश राणे म्हणाले. नितेश राणेंनी राज यांच्या भूमिकेचं स्वागत करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जोरदार समाचार घेतला. फक्त बोलून अंतरंग भगवं होत नाही, असा टोला राणे यांनी लगावला. बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. कित्येक शिवसैनिक बाळासाहेबांमुळे मतदान करतात. बाळासाहेबांना मानणाऱ्या या कडवट शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका आवडलेली नाही. आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. मात्र बाळासाहेबांनी दिलेला विचार शिवसेनेत राहिलेला नाही. बाळासाहेबांच्या विचारांचा सातत्यानं अपमान सुरू आहे, अशा शब्दांत नितेश राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केला. माझं अंतरंग भगवं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात. मात्र केवळ बोलून अंतरंग होत नसतं, असा टोला त्यांनी लगावला. काल बाळासाहेब ठाकरेंची जयंती होती. त्या निमित्तानं गांधी घराण्यातल्या एका व्यक्तीनं तरी बाळासाहेबांना अभिवादन केलं का, असा सवाल राणेंनी उपस्थित केला. शिवसेनेचा कारभार दिल्लीच्या इशाऱ्यावर सुरू आहे. संजय राऊत तर सकाळी केलेली विधानं संध्याकाळी मागे घेत आहेत, असंदेखील ते पुढे म्हणाले. शिवसेनेनं बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली आहे. त्याचे परिणाम त्यांना आगामी निवडणुकांमध्ये पाहायला मिळतील. येत्या निवडणुकांमध्ये शिवसेना कुठेही दिसणार नाही, अशा शब्दांत नितेश राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर स्तुतीसुमनं उधळली. राज ठाकरे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेत आहेत. तेच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत, असं म्हणत त्यांनी राज यांचं कौतुक केलं.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे