शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

मराठा-ओबीसी नेते आरक्षणावरुन आमनेसामने; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 15:40 IST

BJP DCM Devendra Fadnavis News: ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही समाजाचे नेते दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.

BJP DCM Devendra Fadnavis News: मराठा आरक्षणासंदर्भातील ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का न लागण्यासाठी लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सुरू आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा नेते आमनेसामने आल्याचे चित्र आहे. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा दोन्ही समाजातील नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. काही झाले तरी ओबीसीतून आरक्षण मिळावे, यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, यासाठी ओबीसी समाजातील नेते आग्रही आहेत. मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.

कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रश्न सोडवणार आहे

दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आमची सह्याद्रीवर बैठक आहे. आमचे अहित केले असे कोणत्याही समाजाला  वाटू नये. कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रश्न सोडवणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुसरीकडे, आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण दिले पाहिजे. ते टीकलेही पाहिजे, आम्हाला हैदराबादचे गॅझेटही लागू केले पाहिजे. आम्हाला नेहमी यांनी फसवले आहे. कितीही फसवणूक केली तरीही मी समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळवून देणार, तुम्ही आम्हाला फसवले तर आम्ही तुम्हाला डुबवले म्हणून समजायचे. तुम्ही गोड बोलून आम्हाला फसवत आहात, आता आम्ही तुमचा कार्यक्रम करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने ओबीसी नेते उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. परंतु  हाके उपोषणावर ठाम आहेत. ओबीसी आरक्षणास कसा धक्का लागत नाही,  सगेसोयरेचे काय , हे सरकारने सांगावे. येथे निवडणुकांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे. हे महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले आहे. आमच्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले नाही तर हे उपोषण सुरुच राहणार. आम्ही लेखी घेतल्या शिवाय उपोषण सोडणार नाही. आमचा जीव गेले तरी चालेल. आमच्या २९  टक्क्याला कुठेही धक्का लागणार नाही, हे लिहून द्यावे. मागच्या दाराने निघालेले ५७ लाख प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांनी केली.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण