शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये वाजतोय फडणवीसांचा डंका! भाजपनं सांगितलं कसा झाला फायदा?

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 10, 2020 6:41 PM

भाजपने बिहारच्या निवडणुकांचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत त्यांची बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती. जबाबदारी मिळताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला होता.

ठळक मुद्देभाजपने बिहारच्या निवडणुकांचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत त्यांची बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती.जबाबदारी मिळताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला होता. फडणवीसांनी बिहारच्या प्रचाराची धुरा उत्तमरित्या सांभाळली. यामुळे भाजपला घवघवीत यश मिळाले, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होऊ लागला आहे. सध्या एनडीए आघाडीवर असल्याचे चित्र आहे. यातच, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाला. असे बिहार भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय टायगर यांनी म्हटले आहे. असे म्हणत, बिहार मधील या यशाचे श्रेय त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

टायगर म्हणाले, “बिहार निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या, आक्रमक प्रचार केला. पक्षाची बाजू मांडली तसेच विरोधकांच्या चुकीच्या गोष्टींवर त्यांनी बोट ठेवले. एकूणच प्रचार कार्यक्रमात फडणवीसांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाला”, असे बिहार भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय टायगर यांनी म्हटले आहे.मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावाभाजपने बिहारच्या निवडणुकांचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत त्यांची बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती. जबाबदारी मिळताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला होता. “भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्या जबाबदारीला निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करील. या निवडणुकीत एनडीए बहुमताने जिंकेल” असे फडणवीस त्यावेळी म्हणाले होते.

फडणवीसांनी बिहारच्या प्रचाराची धुरा उत्तमरित्या सांभाळली. यामुळे भाजपला घवघवीत यश मिळाले, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.Bihar Assembly Election Results: बिहारमधील भाजपचं यश म्हणजे फडणवीसांचा विजय? शरद पवारांचा मिश्किल टोला; म्हणाले...

बावनकुळेंनीही फडणवीसांना दिले बिहार मधील यशाचे श्रेय - “बिहार निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपने संघटन उभारले आणि पाच वर्षांत जे काम झाले. त्याचा परिणाम निकालावर झालेला दिसतो. एनडीएला जनतेने भरभरून मते दिली आहेत. त्यामुळेच बिहारमध्ये एनडीएची सत्ता पुन्हा येणार असल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसून येत आहे.” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणाले आहे.

Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये अपेक्षित निकाल लागला नाही, शरद पवारांनी सांगितलं कारण

भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी फडणवीसांना दिले बिहार यशाचे श्रेय -बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच यश आणि विजयाचे श्रेय भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने प्रभारी म्हणून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली होती. फडणवीस यांनी बिहार निवडणुकांसाठी रणनिती आखत प्रचारही केला. मात्र, निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात फडणवीस यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते मुंबईत परतले होते. मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांनी उपचार घेऊन कोरोनावर मात दिली. दरम्यानच्या, काळात निवडणूक प्रचाराची सांगता झाली. मात्र, फडणवीस यांनी आपली जबाबदारी निभावली होती. फडणवीस यांच्या रणनितीचं आणि नेतृत्वाच हे यश असल्याचं भाजपचे नेते आणि माजी आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPrasad Ladप्रसाद लाड