मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 10, 2020 01:31 PM2020-11-10T13:31:56+5:302020-11-10T13:46:55+5:30

भुजबळांनी तेजस्वी यादव यांचेही कौतुक केले. "वडील तुरुंगात असतानाही तेजस्वी यांनी अत्यंत कुशलतेने पक्षाचे नेतृत्व केले."

Nashik NCP leader chhagan bhujbal reacted on bihar assembly election results | मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

Next
ठळक मुद्देबिहारमध्ये पुन्हा एनडीएच सरकार स्थापन करणार, असे चित्र आहे. भुजबळ म्हणाले, बिहारमधील विधानसभा निवडणूक अटीतटीची झाली. आता भाजपची पूर्वीसारखी लाट राहिलेली नाही.वडील तुरुंगात असतानाही तेजस्वी यांनी अत्यंत कुशलतेने पक्षाचे नेतृत्व केले - भुजबळ

नाशिक :बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएने मोठी आघाडी घेतली आहे. येथे पुन्हा एनडीएच सरकार स्थापन करणार, असे चित्र आहे. मात्र यातच, "मोदींचा करिष्मा आता राहिलेला नाही, तसेच नितीश कुमारांनाही भाजपच्या रणनीतीचा मोठा फटका बसला आहे," असा दावा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. याच वेळी त्यांनी तेजस्वी यांचेही कौतुक केले. ते नाशिक येथे वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. 

भाजपची पूर्वीसारखी लाट राहिलेली नाही - 
 भुजबळ म्हणाले, "बिहारमधील विधानसभा निवडणूक अटीतटीची झाली. आता भाजपची पूर्वीसारखी लाट राहिलेली नाही. मोदींचा करिष्माही राहिलेला नाही." यावेळी भुजबळ यांनी तेजस्वी यादव यांचेही कौतुक केले. "वडील तुरुंगात असतानाही तेजस्वी यांनी अत्यंत कुशलतेने पक्षाचे नेतृत्व केले. त्यांचे सरकार येवो अथवा न येवो, मात्र, त्यांचे अभिनंदन करायलाच हवे," असे भुजबळ म्हणाले.

Bihar Assembly Election Results : बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढे

"ज्या पक्षाचा आधार घ्यायचा, त्यांनाच कालांतराने संपवायचे, अशी भाजपची रणनीती" -
यावेळी भुजबळ यांनी भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावर सडकून टीका केली. "ज्या पक्षाचा आधार घ्यायचा, त्यांनाच कालांतराने संपवायचे, अशी भाजपची नेहमीचीच रणनीती आहे. भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेतले. केवळ एक-दोन जागा मिळणाऱ्या भाजपने शिवसेनेच्या आधाराने पक्ष वाढवला. हाच प्रयोग त्यांनी बिहारमध्येही केला. त्याचा फटका नितीश कुमारांना आज बसला आहे,' असे भुजबळ म्हणाले.

Bihar Assembly Election Results : पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नका, तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा

31 वर्षीय तेजस्वी यादव यांनी नीतीश कुमारांबरोबर थेट टक्कर -
यावेळी बिहारमध्ये महागठबंधनविरुद्ध एनडीए, अशी काट्याची टक्कर बघायला मिळाली. मात्र, आजचे निकाल म्हणजे गत 15 वर्षांच्या नितिश सरकारसंदर्भातील जनतेचा निर्णय असेल. महत्वाचे म्हणजे, बिहारमध्ये एका मावळत्या पिढीला नव्या आणि उगवत्या पिढीने थेट टक्कर दिली आहे. यात जनतेने नव्या आणि जुन्यात आपले पुढील भविष्य निवडले आहे. या निवडणुकीत 31 वर्षीय तेजस्वी यादव यांनी नीतीश कुमारांबरोबर थेट टक्कर घेतली आहे.  

बिहारमध्ये प्रचंड बहुमताने बनणार एनडीए सरकार -
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी सोमवारी मतमोजणीच्या एक दिवस आधी दावा केला की, बिहारमध्ये एनडीए सरकार प्रचंड बहुमताने बनणार आहे आणि नितीशकुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारतील. त्यांनी एक निवेदन जारी केले, की बिहारमधील तीन टप्प्यांच्या निवडणुका संपल्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मोठ्या संख्येने मतदारांनी एनडीएच्या बाजूने मतदान केले आहे.
 

Web Title: Nashik NCP leader chhagan bhujbal reacted on bihar assembly election results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.