शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:07 IST

Bihar Assembly Election Result: बिहारमध्ये भाजप-जदयूला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीचे आणि त्यातही भाजपचे मनोबल वाढणार असून, काँग्रेसच्या आव्हानांमध्ये भर पडली आहे. 

मुंबई -  बिहारमध्ये भाजप-जदयूला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीचे आणि त्यातही भाजपचे मनोबल वाढणार असून, काँग्रेसच्या आव्हानांमध्ये भर पडली आहे.

बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी, तर नितीशकुमारविरुद्ध तेजस्वी यादव असा सामना होता. मोदी-नितीशकुमार यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्याचे निकालात दिसले. नितीशकुमार यांच्या जदयुचे महाराष्ट्रात अस्तित्व नाही. मात्र, आपल्या सर्वोच्च नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली असताना विजय मिळाल्याने भाजपचे कार्यकर्ते, नेते यांना बळ मिळाले आहे. 

‘लाडकी बहीण’चा फायदामहाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आधी महिन्याकाठी दीड हजार रुपये देणारी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आणली आणि त्याचा प्रचंड फायदा महायुतीला निकालात झाला होता. बिहारमध्ये त्याच धर्तीवर, पण एकदा दहा हजार रुपये लाखो महिलांना देण्यात आले, त्याचा मोठा फायदा जदयू-भाजप युतीला झाला. 

‘ते’ भाकीत ठरले खोटे बिहारमधील निकालानंतर केंद्रातील सरकार कोसळेल व महाराष्ट्रातही त्याचे परिणाम दिसतील असे भाकीत उद्धवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केले होते. मात्र, ते भाकीत सपशेल खोटे ठरले आहे.  विधानसभेला महाराष्ट्रात मविआला दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यातून अद्यापही सावरलेली नसताना मविआला आता हा ‘जोर का झटका’ मिळाला आहे.

महाराष्ट्रात काय होणार?बिहारमधील मतदारयाद्यांवरून राजद व काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगासह केंद्र व बिहार सरकारवर आरोपांची राळ उठविली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा आणि महाराष्ट्र, बिहारमधील मतचोरीचे अनेक आरोप केले. मात्र, या आरोपांचाही मतदारांवर परिणाम झाला नाही हे बिहारच्या निकालाने दिसले. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, उद्धवसेना, शरद पवार गटाने मतचोरी आणि दुबार मतदारांवरून रान उठविले, त्याचा परिणाम आगामी निवडणुकीत होणार का, हे बघणे औत्सुक्याचे असेल. बिहारच्या निकालामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत बिहारी व हिंदी मते भाजपच्या बाजूने एकटतील असेही म्हटले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Victory Boosts Ruling Alliance for Local Body Elections

Web Summary : Bihar's BJP-JDU victory strengthens Maharashtra's ruling alliance for local elections, boosting BJP morale. Congress's vote-rigging claims failed in Bihar. Similar financial schemes aided the victory. Uddhav Sena's predictions proved false. Mumbai elections may see increased BJP support from Bihari voters.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाMahayutiमहायुती