शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक बातमी! शिर्डीत पकडलेल्या भिक्षेकर्‍यापैकी चौघांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू, कुणाचा हलगर्जीपणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:09 IST

Shirdi Beggars news: जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत फक्त दोन भिक्षेकर्‍यांचाच मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे सांगितले असले तरी सद्यस्थितीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. 

अहिल्यानगर : शिर्डी येथे पकडलेल्या भिक्षेकरांना विसापूर कारागृहात हलवण्यात आले होते. त्यातील १३ भिक्षेकर्‍यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र ते पळून जात असल्याने त्यांना बांधून ठेवण्यात आले होते. यातीलच १३ पैकी चार भिक्षेकरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा रुग्णालयातून मिळाली आहे. 

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी सांगितले की, दोन भिक्षेकर्‍यांचा मृत्यू झालेला आहे. याबाबत त्यांच्यावर काय उपचार झाले? कोणाचा हलगर्जीपणा होता? याबाबत चौकशी केली जाईल. 

जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत फक्त दोन भिक्षेकर्‍यांचाच मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे सांगितले असले तरी सद्यस्थितीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. 

दरम्यान भिक्षेकर्‍यांना विसापूर कारागृहातून नगरच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर आम्हाला बांधून ठेवले. अन्न पाणी दिले नाही. उपचारही करण्यात आले नाहीत, असे तेथील काही भिक्षेकर्‍यांनी माध्यमांना सांगितले.

श्रीराम नवमी निमित्त शिर्डी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेमध्ये भिक्षेकर्‍यांना पकडण्यात आले होते. त्यापैकी काही भिक्षेकर्‍यांना विसापूर येथे रवाना करण्यात आले होते. तेथीलच १३ भिक्षेकर्‍यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

टॅग्स :shirdiशिर्डी