शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

‘अन्सर की’ घोटाळ्यात मोठे मासे!

By admin | Updated: November 4, 2014 02:39 IST

यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीतील प्रश्नपत्रिका फुटल्या कशा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही

औरंगाबाद/यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीतील प्रश्नपत्रिका फुटल्या कशा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘अन्सर की’ विकणाऱ्या टोळीचा सूत्रधार मकरंद खामणकरला पोलिसांनी प्रश्नपत्रिका कुणी दिल्या, हे जाणून घेण्यासाठी ‘खाक्या’ दाखविला. मात्र, तो तोंड उघडण्यास तयार नाही. ‘साहेब मी जर लींक उघड केली तर माझा जीव जाईल,’ असे तो पोलिसांना सांगत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावरून या रॅकेटमध्ये मोठमोठे मासे अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी यवतमाळला जाणार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेतर्फे २ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागांच्या जवळपास १०५ पदांसाठी लेखी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेच्या ‘अन्सर की’ औरंगाबादच्या एका टोळीने फोडल्या असून, पैसे घेऊन त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानंतर शनिवारी मध्यरात्री औरंगाबाद पोलिसांनी सातारा परिसरात सापळा रचून टोळीचा सूत्रधार तथा विक्रीकर निरीक्षक मकरंद मारुती खामणकर, वाडेकर क्लासेसचा संचालक दादासाहेब राधो वाडेकर, भागिनाथ साहेबराव गायके, मध्यवर्ती बँकेतील क्लर्क विनोद दत्तात्रय वरकड, परभणी आरटीओतील लिपिक पोपट कऱ्हाळे, महेश गायकवाड (रा. धामनगाव, आमरावती), महादेव नायसे (रा. बोरगाव, अकोला), सुरेश आरसूळ (रा. पराडा, अंबड, जालना), काळूसिंग नायमनी (रा. शेवगा, औरंगाबाद), केशव सोनकांबळे (रा. परभणी), सचिन गायकवाड (रा. हडको, औरंगाबाद) या ११ जणांना अटक करण्यात आली. आरोपींकडे अन्सर की सापडल्या. तसेच विद्यार्थ्यांकडून यापोटी घेतलेल्या १३ लाख ७८ हजार रुपयांची रोकडही सापडली. ती पोलिसांनी जप्त केली आहे. (प्रतिनिधी)