शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

नवनिर्वाचित शिक्षणमंत्र्यांसमोर आव्हानांचा डोंगर : विशेष लक्ष द्यावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 18:17 IST

नव्या मंत्रिमंडळातील खातेवाटपातील संभ्रम आता दूर

ठळक मुद्देगुणवत्तावाढ, पदभरती, प्रशिक्षण, नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदलकेंद्र शासनाकडून लवकरच नवीन शिक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली जाणार शुल्कवाढीचा कोणताही अधिकार शैक्षणिक संस्थांना नाही

पुणे : जागतिक स्तरावरील शैक्षणिक संस्थांशी स्पर्धा करण्यासाठी राज्यातील विद्यापीठांच्या व महाविद्यालयांच्या गुणवत्तावाढीबरोबरच केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, विनाअनुदानित महाविद्यालयांच्या सक्षमीकरणाकडे लक्ष देणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरणे, व्यावसायिक अभ्यासक्रमांची संथगतीने होणारी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुधारणे, सर्व सरकारी शाळांच्या गुणवत्तावाढीकडे विशेष लक्ष देणे, अशा शिक्षण क्षेत्रातील अनेक आव्हानांचा डोंगर नव्या शालेय शिक्षण, उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसमोर आहे.

नव्या मंत्रिमंडळातील खातेवाटपातील संभ्रम आता दूर झाला असून, राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रिपदी वर्षा गायकवाड, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रिपदी उदय सामंत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रिपदी अमित देशमुख यांची नावे निश्चित झाली आहेत. या मंत्र्यांसमोर शिक्षण क्षेत्रातील अनेक लहान-मोठी आव्हाने असून, पुढील काळात त्यांची सोडवणूक करावी लागणार आहे, अशा प्रतिक्रिया पुण्यातील शिक्षण तज्ज्ञांनी दिल्या आहेत. तसेच केंद्र शासनाकडून लवकरच नवीन शिक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे, त्यादृष्टीनेसुद्धा नव्या मंत्र्यांना ठोस पावले टाकावी लागणार आहेत.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. नंदकुमार निकम म्हणाले, शाळा महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदांची भरती, शिक्षकांचे प्रशिक्षण, गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपाययोजना, महाविद्यालयांना राष्ट्रीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सक्षम करणे, अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयांचा ढासळलेल्या दर्जा सुधारणे. उद्योग आणि शिक्षण यांच्यात दुवा निर्माण करणे, राज्याच्या अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी तरतूद वाढविणे, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्लिश किंवा इतर प्रयोग करून या शाळांचा दर्जा वाढवणे, विद्यार्थ्यांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे आदी आव्हाने नव्या शिक्षणमंत्र्यांसमोर आहेत. तसेच ‘गेल्या काही वर्षांपासून शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य संघटना यांच्याशी असणारा शासनाचा संवाद बंद झाला आहे. संवादातूनच संघटनांचे प्रश्न सुटतात. त्यामुळे तुटलेला संवाद पुन्हा सुरू  करावा लागणार आहे,’ असेही निकम म्हणाले. विद्यापीठ विकास मंचचे प्रांतप्रमुख डॉ. ए. पी. कुलकर्णी म्हणाले, प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाकडे लक्ष देऊन विद्यापीठांमधील परीक्षांचे निकाल वेळेत लावून त्यात पारदर्शकता आणणे, पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षा मूल्यांकनातील शंका दूर करणे, विद्यापीठामध्ये सुरू केलेल्या क्रेडिट सिस्टीमची अंमलबजावणी करणे आदी कामांमध्ये पुढील काळात शिक्षणमंत्र्यांना लक्ष द्यावे लागेल..............शुल्कवाढीचा कोणताही अधिकार शैक्षणिक संस्थांना नाहीशिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन म्हणाले, अलीकडच्या काळात परदेशी विद्यापीठांमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. मात्र, अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता वाढविण्याचा, अभ्यासक्रमाचे शुल्क वाढ करण्याचा कोणताही अधिकार शैक्षणिक संस्थांना नाही. .........च्शासनाकडून शाळा, महाविद्यालयांना मिळणारे वेतनेतर अनुदानही बंद झाले आहे. परिणामी शिक्षणसंस्थांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे नव्या मंत्र्यांसमोर महाविद्यालयांना सक्षम करण्यासाठी व रूसासारख्या योजनांंचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान आहे. तसेच शालेय स्तरावर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून दर्जेदार शिक्षण कसे होईल, याबाबतही विचार करावा लागेल.......मुख्य म्हणजे शिक्षण हा विषय गांभीर्याने घ्यावा लागेल. प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागेल. तसेच नियोजनबद्ध कार्यक्रम आखून कालबद्ध निर्णय घ्यावे लागतील. त्याचप्रमाणे शैक्षणिक निर्णय घेताना धरसोड धोरण थांबवून आणि सर्व निर्णयात एकवाक्यता ठेवावी लागेल. तर राज्यातील शिक्षणाला दिशा आणि गती मिळेल.- अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयSchoolशाळाUday Samantउदय सामंतVarsha Gaikwadवर्षा गायकवाडAmit Deshmukhअमित देशमुख