शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 19:24 IST

Delhi Red Fort Blast:लाल किल्ल्याजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये अचानक स्फोट झाला.

नवी दिल्ली:  राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी(दि.10) सायंकाळी भीषण स्फोट झाला. ही घटना लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ घडली. एका कारमध्ये स्फोट झाला, ज्यानंतर शेजारी उभ्या अनेक गाड्याही जळून खाक झाल्या. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत 8 ते 9 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. स्फोटाच्या वेळी परिसरात मोठी गर्दी होती. पोलिसांनी तात्काळ परिसर रिकामा करुन लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या आसपास सुरक्षा वाढवली आहे. NIA आणि NSG कमांडोदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट

स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही, मात्र कारमधील CNG सिलिंडरमुळे स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही. दुसरी शक्यता अशीही मांडली जात आहे की, कारमध्ये विस्फोटक पदार्थ असू शकतो. दिल्ली पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून, बॉम्ब स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहेत.

संशयाची सुई फरीदाबाद घटनेकडे

आजच पोलिसांनी मोठी कारवाई करत एका मोठ्या दहशतवादी कटाचा खुलासा केला आहे. या कारवाईत फरीदाबादमध्ये तब्बल 2900 किलो अमोनियम नायट्रेट सापडले आहे. हे रसायन सामान्यतः स्फोटक तयार करण्यासाठी वापरले जाते. त्या घटनेचा दिल्ली स्फोटाची संबंध आहे का, हे अद्याप समोर आले नाही. पोलिसांच्या तपासानंतरच सत्य समोर येईल. सध्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Blast near Red Fort in Delhi; Cause Unknown

Web Summary : A major blast occurred near Delhi's Red Fort around 7 PM today. A car exploded near Red Fort Metro Station Gate 1, igniting a fire that engulfed three other vehicles. The cause of the explosion remains unclear. Further details are awaited.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटRed Fortलाल किल्ला