Supriya Sule News: मोठी बातमी! सुप्रिया सुळे यांचा मोबाईल, व्हॉट्सअप हॅक; ट्विटकरून केले हे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 13:18 IST2024-08-11T13:18:36+5:302024-08-11T13:18:51+5:30

Supriya Sule Mobile Hack: सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअप हॅक झाले आहे. याची माहिती स्वत: सुळे यांनी एक्स अकाऊंटवरून दिली आहे.

Big breaking news! Supriya Sule's Mobile, Whatsapp Hack; This appeal was made through tweet | Supriya Sule News: मोठी बातमी! सुप्रिया सुळे यांचा मोबाईल, व्हॉट्सअप हॅक; ट्विटकरून केले हे आवाहन

Supriya Sule News: मोठी बातमी! सुप्रिया सुळे यांचा मोबाईल, व्हॉट्सअप हॅक; ट्विटकरून केले हे आवाहन

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअप हॅक (Mobile Hack) झाले आहे. याची माहिती स्वत: सुळे यांनी एक्स अकाऊंटवरून दिली आहे.

आज दुपारी १ च्या सुमारास सुळे यांनी ही पोस्ट करत कार्यकर्त्यांना व जनतेला सावध राहण्यास सांगितले आहे. अत्यंत महत्वाचे आहे असे म्हणत सुळे यांनी हा मेसेज केला आहे. कोणीही त्यांना फोन किंवा मेसेज करून नये असे त्या म्हणाल्या आहेत. 

''माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. - सुप्रिया सुळे'', असे ट्विट करून सुप्रिया सुळे यांनी लोकांना सावध केले आहे. 
 

Web Title: Big breaking news! Supriya Sule's Mobile, Whatsapp Hack; This appeal was made through tweet