शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव महापालिकेत सीमाप्रश्नाचा ठराव नाही

By admin | Updated: November 18, 2014 02:24 IST

मराठी भाषिकांची सत्ता असतानाही महानगरपालिका बैठकीत मराठी भाषिक नगरसेवकांनी सीमाप्रश्नाचा ठराव तर मांडला नाही

बेळगाव : मराठी भाषिकांची सत्ता असतानाही महानगरपालिका बैठकीत मराठी भाषिक नगरसेवकांनी सीमाप्रश्नाचा ठराव तर मांडला नाही. शिवाय बेळगावच्या नामांतराबाबत एकही शब्द उच्चारला नाही. त्यामुळे बैठकीत पुन्हा मराठी नगरसेवकांचे बेगडी प्रेम समोर आले आहे. बेळगाव महापालिकेच्या पहिल्या बैठकीत सीमाप्रश्नाचा ठराव न मांडल्याने आणि कर्नाटक सरकार कारवाई करील या भीतीने १ नोव्हेंबर या काळ्यादिनाच्या सायकलफेरीत मराठी नगरसेवक सामील झाले नव्हते. यामुळे महापौर महेश नाईक, उपमहापौर रेणू मुतगेकर यांच्या विरोधात मराठी जनतेने रोष व्यक्त केला होता. महापौरांच्या घरावर मोर्चा काढला होता. काही नगरसेवकांना बैठकीत बोलावून ठराव न मांडल्याबद्दल जाबही विचारला होता, पण मराठी भाषिक नगरसेवक सभागृहात गप्प राहिले. मात्र, बेळगाव शहराचे नामांतर बेळगावी असे केल्याने या नामांतराला मराठी नगरसेवकांकडून महापालिकेत विरोध अपेक्षित होता, मात्र सर्वसाधारण बैठकीत बेळगावी नामांतराविरोधात ‘ब्र’सुद्धा न काढल्याने मराठी भाषिकांत संताप व्यक्त होत आहे. मराठीत बेळगाव, कन्नडमध्ये बेळगावी आणि इंग्रजीमध्ये बेलगाम असेच आहे. सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे आम्ही त्यावर लक्ष केंद्रित केल्याचे महापौर महेश नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)