शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये बँकेतून १६ लाख पळविले

By admin | Updated: July 29, 2015 02:05 IST

शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील आयसीआयसीआय बँकेतून सात जणांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कॅश काऊंटरच्या मागील तब्बल १६ लाखांची रोकड

बीड : शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील आयसीआयसीआय बँकेतून सात जणांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कॅश काऊंटरच्या मागील तब्बल १६ लाखांची रोकड असलेली बॅग मंगळवारी भर दुपारी पळविली. बँकेतील सीसीटीव्हीत हे चोरटे कैद झाले असून, त्यांच्या शोधासाठी जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे. दुपारी १ वाजेच्या सुमारास सहा ते सात व्यक्ती बँकेत घुसले. यातील काहींनी पोस्ट आॅफिस कुठे आहे, अशी चौकशी केल्यानंतर शाखा व्यवस्थापकास आम्हाला बँकेत एक लाख रुपये जमा करायचे आहेत, असे सांगितले. कॅश काऊंटरच्या मागच्या बाजूला असलेल्या दरवाजातून शिपाई आत जाऊन बाहेर आला. त्याचवेळी एक जण तेथे जाऊन १६ लाख रुपये रक्कम ठेवलेली बॅग उचलून बाहेर पडला. त्यापाठोपाठ त्याचे सहकारीही निघून गेले. त्यानंतर बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. फूटेजमध्ये काही चोरांचे चेहरे स्पष्ट दिसत नसले तरी त्यांचा पेहराव लक्षात येत आहे. चोरटे २५ ते ३५ वयोगटातील आहेत. (प्रतिनिधी)अवघ्या ३० सेकंदांत : बँकेचा शिपाई कॅश काऊंटरच्या मागच्या दारातून आतील भागात गेला. दरवाजातून गेल्यानंतर तो ३० सेकंदांत बंद होतो. शिपाई बाहेर येताच अवघ्या ३० सेकंदांत चोरट्याने आतून बॅगआणली. हे सर्व आरोपी कोल्हापूर परिसरातील असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. देना बँकेतील डाव फसला : आयसीआयसीआय बँकेच्या मागच्या बाजूला असणाऱ्या देना बँकेतही हे चोरटे गेले होते. तेथे डाव फसल्यामुळे त्यांनी आयसीआयसीआय बँकेकडे मोर्चा वळविला.