शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
4
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
5
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
6
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
7
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
8
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
9
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
10
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
11
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
12
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
13
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
14
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
15
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
16
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदाणीवरुन रूममेट्स भिडले
17
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
18
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
19
Aparna Yadav: किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
20
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे आयुर्वेदिक सुवर्ण प्राशनाने भूतबाधा दूर होते! डॉक्टरांचा फंडा; नागरिकांची दिशाभूल

By admin | Updated: July 3, 2014 23:09 IST

लहान बालक ांना आयुर्वेदिक सुवर्ण प्राशन दिल्यास भूतबाधा दूर होत असल्याचा प्रसार केला जात आहे.

अकोला : देवापेक्षा विज्ञानावर विश्वास ठेवणार्‍या खुद्द डॉक्टरांकडूनच अंधश्रद्धेला खतपाणी घातल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लहान बालक ांना आयुर्वेदिक सुवर्ण प्राशन दिल्यास भूतबाधा दूर होत असल्याचा प्रसार केला जात आहे. शहरातील एका डॉक्टरचा हा फंडा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान असून, या बाबीची गंभीर दखल मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांनी घेतली आहे.
पुष्प नक्षत्राच्या मुहूर्तावर लहान बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शहरातील एका डॉक्टरने २७ जुलै ते २ मार्च २०१५ पर्यंत आयुर्वेदिक सुवर्ण प्राशन शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिर यशस्वी होण्यासाठी सुवर्ण प्राशनाचे प्रचंड फायदे असल्याचे मनावर बिंबवल्या जात असल्याचे समोर आले. शून्य ते १२ वयोगटातील मुलांना सुवर्ण प्राशन दिल्यास त्यांची बुद्धी, बल, आयुष्य, वीर्य व वर्ण वाढत असल्याचा दावा केला आहे. यातही कहर म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांच्या अंधश्रद्धेला चालना देत सुवर्ण प्राशनामुळे लहान मुलांमधील भूतबाधा दूर होऊन पुण्याचा लाभ होत असल्याचा प्रसार केल्यामुळे संबंधित डॉक्टरांचे शिबिर वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. १० रुपये नोंदणी शुल्क आकारून औषधी सेवनासाठी ४० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. अवघ्या ४० रुपयांत आयुर्वेदिक औषधीच्या सेवनामुळे भूतबाधा दूर होत असल्याच्या प्रसाराने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची सुशिक्षित डॉक्टरांकडूनच ऐशीतैशी होत आहे. या गंभीर प्रकाराची महापालिकेच्या आरोग्य विभागाने दखल घेतली असून, ही नागरिकांची शुद्ध फसवणूक असल्याचे मनपाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख यांनी स्पष्ट केले.

** पदवीचा उल्लेख टाळला
आयुर्वेदिक औषधी देण्याचा अधिकार फक्त आयुर्वेदातील तज्ज्ञ डॉक्टरांनाच आहे. हा प्रसार करणार्‍या डॉक्टरांनी मात्र त्यांच्या पदवीचा उल्लेख टाळला, हे येथे उल्लेखनीय.

** आयुर्वेदाचार्य डॉक्टरांना आयुर्वेदिक औषधी देण्याचे अधिकार आहेत. सुवर्ण प्राशनामुळे भूतबाधा दूर होण्याचा प्रकार विचित्र वाटतो. आम्ही यापूर्वीसुद्धा अशा स्वरूपाच्या सुवर्ण प्राशन शिबिरांचा घोळ उघडकीस आणला होता. सुवर्ण प्राशन शिबिराला मनपाची मान्यता नाही. ही शुद्ध नागरिकांची फसवणूक असून, प्रकार घडल्यास निश्चित कारवाई केल्या जाईल.
-डॉ. फारुख शेख, निवासी वैद्यकीय अधिकारी, मनपा