शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : कॅरीबॅगच्या कारवाईस व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 20:31 IST

मागील सहा महिन्यांपासून शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या घनकचरा विभागाकडून दररोज वेगवेगळ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक

मनपाकडून पोलीसात तक्रार : अंगुरीबाग येथे कारवाई दरम्यान तणाव

औरंगाबाद : मागील सहा महिन्यांपासून शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या घनकचरा विभागाकडून दररोज वेगवेगळ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी सायंकाळी महापालिकेचे पथक अंगुरीबाग येथे पोहोचल्यावर परिसरातील व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला. २०० पेक्षा अधिक नागरिक-व्यापाऱ्यांच्या जमावाने मनपा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून मनपातर्फे रात्री सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.शासनाने पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे. या पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. शहरातील विविध नाल्यांमध्येही कमी जाडीच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पावसाळ्यात नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळत नाही. डिसेंबर २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्तांनी शहरात कॅरीबॅगमुक्तीसाठी जोरदार मोहिम सुरू केली. शहरात कॅरीबॅग विकणाऱ्या आणि वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा असे आदेश तत्कालीन आयुक्तांनी दिले होते. मागील सहा ते सात महिन्यांपासून मनपाच्या घनकचरा विभागातर्फे ही कारवाई सुरू आहे.मंगळवारी सायंकाळी मनपाचे पथक अंगुरीबाग येथील कॅरीबॅग विकणाऱ्या दुकानदारांची झाडाझडती सुरू केली. यावेळी अचानक व्यापारी एकत्र झाले. त्यांनी मनपाच्या पथकाला पिटाळून लावले. यावेळी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळही करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे मनपाने कारवाईला तुर्त पुर्णविराम दिला. नंतर घनकचरा विभाग प्रमुख शिवाजी झनझन यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.