शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

५० हजारांची लाच घेताना प्रकल्प अधिकारी अटकेत

By admin | Updated: March 15, 2017 21:36 IST

आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पुरवठा केलेल्या वस्तूंच्या बिलाच्या मंजुरीसाठी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी

नाशिक : आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पुरवठा केलेल्या वस्तूंच्या बिलाच्या मंजुरीसाठी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी ५० हजार रुपये घेणारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी भिला शंकर देवरे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि़१५) दुपारी सापळा लावून रंगेहाथ पकडले़ या प्रकरणामुळे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सुरू असलेल्या टक्केवारीवर प्रकाश पडला आहे़आदिवासी विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना नित्योपयोगी वस्तूंचा (साबण, खोबरेल तेल आदि) पुरवठा करण्याचे काम एका संस्थेकडे आहे़ या संस्थेच्या व्यवस्थापकांनी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पुरवठा केलेल्या वस्तूंचे ३० लाख ५९ हजार रुपयांचे बिल आदिवासी विकास भवन कार्यालयातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर केले होते़ सहायक प्रकल्प अधिकारी भिला देवरे यांची संस्थेच्या व्यवस्थापकांनी बिलाच्या मंजुरीसाठी भेट घेतली असता बिलाच्या एकूण रकमेच्या पाच टक्के अर्थात १ लाख ५० हजार रुपयांची लाचेची देवरे यांनी मागणी केली़याबाबत पुरवठादार संस्थेच्या व्यवस्थापकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीवरून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी सापळा लावला होता़ प्रकल्प अधिकारी देवरे यांनी व्यवस्थापकाकडे तडजोडीअंती ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम घेताच रंगेहाथ पकडण्यात आले़ दरम्यान, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी संशयित प्रकल्प अधिकारी भिला देवरे यांच्याविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अटक केली आहे़