शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण मुलीवर अत्याचार

By admin | Updated: September 29, 2014 01:00 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भरती असलेल्या एका अल्पवयीन मुलीची सोनोग्राफी करीत असताना डॉक्टरने बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

मेडिकल : सोनोग्राफी करताना डॉक्टराचे दुष्कृत्यनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भरती असलेल्या एका अल्पवयीन मुलीची सोनोग्राफी करीत असताना डॉक्टरने बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या या घटनेमुळे मेडिकलमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित १४ वर्षीय मुलगी ही उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. तिला पोटाचा त्रास होता. नागपुरात तिचा मामा राहतो. गरीब कुटुंबातून असल्याने मामाने तिला उपचारासाठी मेडिकलमध्ये आणले होते. मुलीची स्थिती पाहून तिला भरती करण्यात आले. शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास डॉ. पंडित पाचोरे याने तिचे सिटी स्कॅन केले. यावेळी तिच्यासोबत महिला अटेंडन्स होती. सिटी स्कॅन झाल्यानंतर तिला सायंकाळी सोनोग्राफी करण्यास सांगितले. सायंकाळी ५.४५ मिनिटांनी तिला सोनोग्राफीसाठी आणले. यावेळी तिच्यासोबत मामाचा मुलगाही होता. रेडिओलॉजी विभागाच्या ८६ क्रमांकाच्या कक्षात सोनोग्राफी तपासणी केली जाते. यावेळी सोनोग्राफी कक्षात डॉ. पंडित पाचोरे होते, परंतु कुठलीही महिला अटेंडन्स किंवा परिचारिका नव्हती. विशेष म्हणजे नियमानुसार पुरुष डॉक्टर जर महिलेची तपासणी करीत असेल तर कुणीतरी महिला सोबत असणे आवश्यक आहे. परंतु डॉ. पाचोरे यांनी कक्षात असलेल्या महिला परिचारिकला सोबत न घेता एकट्यानेच सोनोग्राफी केली. मुलीने तक्रारीत सांगितल्याप्रमाणे, पहिल्या वेळी सोनोग्राफीची तपासणी करीत असताना छेडखानी होत असल्याचे समजले नाही, परंतु डॉ. पाचोरे यांनी जेव्हा आपत्तीजनक बोलायला सुरुवात केली तेव्हा संशय आला. परंतु सोबत कुणीच नसल्याने गप्प होते. सोनोग्राफी तपासणीनंतर मुलगी वॉर्डात आली. तिला राहून राहून डॉक्टराचे दुष्कृत्य आठवत होते. तिने ही आपबिती शेजारच्या महिला रुग्णाला सांगितली. महिला रुग्णाने मामाच्या मुलाला याची माहिती देण्यास सांगितले. मामाच्या मुलाने तात्काळ नातेवाईकांना बोलवून घेतले. नातेवाईकांनी अजनी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलम ६ आणि १०, ३७६ (क) (ड) (बलात्कार) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)