Ashok Kharat Case : 'अधिवेशनापूर्वीच SIT नेमली, निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने प्रकरण बाहेर येऊ द्यायचं नव्हतं'; भास्कर जाधवांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 15:52 IST2026-03-21T15:33:19+5:302026-03-21T15:52:43+5:30

Ashok Kharat Case : नाशिकमधील अशोक खरात याने केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले आहेत. आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मोठा दावा केला आहे.

Ashok Kharat Case: 'SIT appointed before the session, did not want to let the matter come out as half the cabinet was in it'; Bhaskar Jadhav's big claim | Ashok Kharat Case : 'अधिवेशनापूर्वीच SIT नेमली, निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने प्रकरण बाहेर येऊ द्यायचं नव्हतं'; भास्कर जाधवांचा मोठा दावा

Ashok Kharat Case : 'अधिवेशनापूर्वीच SIT नेमली, निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने प्रकरण बाहेर येऊ द्यायचं नव्हतं'; भास्कर जाधवांचा मोठा दावा

Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. खरात याने अनेक महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अशोक खरात यांच्या ट्रस्टच्या सदस्या रुपाली चाकणकर असल्याचे समोर आले, यामुळे आता चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी एक मोठा दावा केला आहे.रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला ते चांगलंच झालं, पण केवळ त्यांच्यापर्यंतच हे प्रकरण नाही. याप्रकरणात अनेक उच्चपसदस्थ अधिकारी आहेत, असा खळबळजनक दावा जाधव यांनी केला.

अशोक खरातच्या आश्रमाला ठाकरेंच्या काळात ३९ लाख लीटर पाणी; उद्धव ठाकरे म्हणाले, 'चौकशी करा...'

"अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच SIT नेमण्यात आली आहे. मात्र, निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचे नव्हते. केवळ पत्रकार आणि पीडित महिलेमुळे हे प्रकरण बाहेर आले, अन्यथा हे प्रकरण सरकारने प्रकरण दाबले असते, असा गौप्यस्फोट आमदार भास्कर जाधव यांनी केला. या प्रकरणी एसआयटी कधी स्थापन केली याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी अशी मागणी जाधव यांनी केली. 

पत्रकार परिषदेत बोलताना भास्कर जाधव म्हणाले, अधिवेशन काळात सरकारने याबाबत वस्तुस्थिती मांडणे गरजेचे होते. कारण, यात फक्त रुपाली चाकणकर आणि राजकीय पुढारी आहेत असे नाही, यात उच्चपदस्थ अधिकारी देखील असून अशोक खरातची उठबस करण्यात ते गुंतले आहेत. केवळ चाकणकर यांचा राजीनामा घेऊन सरकारने या विषयावरील लक्ष दुसरीकडे वळवू नये, राजीनामा झाला म्हणजे प्रकरण संपले असे समजू नये. सरकारमधले अनेक मंत्री आणि अधिकारी यात असल्याने हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत आहे.

"या प्रकरणात आयएएस, आयपीएस अधिकारी आहेत. हे प्रकरण पोलिसांना देखील माहित होते, म्हणून हे प्रकरण बाहेर आले नाही, असा खळबळजनक दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. हे प्रकरण तडीस जावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. मात्र, सरकारची एकूण वृत्ती पाहून काही पुढारी आणि अधिकाऱ्यांच्या फाईल्स आपल्या ढुंगणाखाली दाबून ठेवून ते राजकीय फायद्यासाठी वापरतील, असा आरोप जाधव यांनी केला.

Web Title : अशोक खरात मामला: मंत्रियों की संलिप्तता का आरोप, सत्र से पहले SIT गठित, जाधव का दावा।

Web Summary : भास्कर जाधव ने अशोक खरात मामले में उच्च पदस्थ अधिकारियों और मंत्रियों के शामिल होने का आरोप लगाया है। उन्होंने दावा किया कि मामले को दबाने के लिए विधानसभा सत्र से पहले एसआईटी का गठन किया गया था, जो केवल मीडिया और पीड़ितों के कारण सामने आया। जाधव ने फडणवीस से एसआईटी के समय के बारे में स्पष्टीकरण मांगा है।

Web Title : Ashok Kharat Case: Minister involvement alleged, SIT formed pre-session, claims Jadhav.

Web Summary : Bhaskar Jadhav alleges high-ranking officials and ministers are involved in the Ashok Kharat case. He claims the SIT was formed before the assembly session to suppress the matter, which only surfaced due to media and victims. Jadhav demands clarification from Fadnavis regarding the SIT's timing.