शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Kharat : भोंदू खरातने पुण्यात मुलीच्या नावे १ कोटी ३० लाखांचा घेतला फ्लॅट; कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 12:23 IST

Ashok Kharat : पुण्यात मुलीच्या नावे खरातने खरेदी केलेला एक कोटी तीस लाख रुपयांचा फ्लॅट रोख स्वरुपात घेतला होता, ही बाब तपासात उघड झाली आहे.

भोंदू अशोक खरातच्या कॅश नेटवर्कचे अनेक पैलू एसआयटीने तपासात उघड केले असून फक्त भक्तांकडूनच तो रोखीने व्यवहार करीत नव्हता तर कोट्यवधीचे व्यवहारही त्याने कॅश नेटवर्कद्वारे उभे केल्याचं उघड झालं आहे. पुण्यात मुलीच्या नावे खरातने खरेदी केलेला एक कोटी तीस लाख रुपयांचा फ्लॅट रोख स्वरुपात घेतला होता, ही बाब तपासात उघड झाली आहे. 

एसआयटी आपल्या तपासात भोंदू अशोक खरातच्या मोबाईलमधील कोड नेटवर्कचे जाळं तपासत असताना त्याच्या कॅश नेटवर्कच्या अनेक बाबी पडताळून पाहण्यात आल्या. अशा रोखीने व्यवहाराच्या अनेक बाबी एसआयटीच्या तपासात उघड झाल्या असून, खरात हा व्यवहारात अतिशय चलाख होता. कुठेही अडकणार नाही, याची तो खबरदारी घेत होता. खरातने पुण्याच्या मॉडर्न कॉलनी या उच्चभ्रू वसाहती मुलीच्या नावाने फ्लॅट घेतला आहे, त्यासाठी खरातने एक कोटी ३० लाख रुपये बिल्डरला रोखीने दिल्याचे उघड झाले.

'या' सोसायटीत खरेदी केला होता फ्लॅट

खरात याने मागच्या चार वर्षात जवळपास ७० कोटींच्या प्रॉपर्टी अहिल्यानगर, नाशिक, पुणे या भागात घेतल्या आहेत. त्यासाठीदेखील खरातने १० टक्के पेमेंट रोखीने केल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाले असून, त्याने काही प्रॉपर्टीमाध्ये आपले स्वत:चे नाव न घेता पार्टनर म्हणून दुसऱ्याचेच नाव घेतले आहे.
खरात भक्तांकडून जे लाखो रुपये उकळत असे, तेदेखील तो रोख घेत होता. यासाठी एसआयटीने मागच्या तीन दिवसात त्याचे बँक अकाउंट तिसऱ्यांदा तपासले. त्यात ही बाब उघड झाली आहे.

गुप्तधनाचा मोह, प्रगतीची आस; संकटातून बाहेर पडण्यासाठी महिला भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात

भोंदू खरात याचे दोन मोबाइल एसआयटीने जप्त केले आहेत, त्यातदेखील खरातच्या कॅश नेटवर्कचे जाळे उघड झाले असून, रोखीने पैसे स्वीकारण्यासाठी त्याने एक अगदी जवळच्या नातेवाईकांमधील स्वतंत्र टीम तयार केली होती. खासकरून त्याने यासाठी पत्नीच्या माहेरच्यांना हाताशी धरल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. तसेच अनेक व्यवहारात त्याची पत्नीदेखील रोखीने पैसे स्वीकारत होती.

भोंदूबाबा अशोक खरातने शेतकऱ्याची १० कोटींची जमीन हडपली; सावकारीचा धंदा जोरात

खरातने नाशिकमधील बंगला तसेच ओकस प्रॉपर्टी ऑफिसमध्ये दोन वर्षांपूर्वी दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. यासाठी लाखो रुपये खरातने खर्च केले. हा व्यवहारदेखील खरात याने रोखीने केला होता. डिझायनर, बांधकाम कारागीर, फर्निचर कारागीर यांना खरातने जवळपास २५ लाख रुपये रोखीने दिल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाल्याचे सांगण्यात येते.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Guru Kharat Buys Daughter Flat with Cash; Network Exposed

Web Summary : Self-proclaimed guru Ashok Kharat's cash network is under investigation. He allegedly bought a flat for his daughter in Pune for ₹1.3 crore in cash. He owns properties worth ₹70 crore and uses cash for transactions. His relatives and wife are also involved in handling cash.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस