शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 18:06 IST

Amravati Municipal Election 2026 Eknath Shinde Shiv Sena: धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही हे मतदारांनाही माहितीये, असेही शिंदे म्हणाले

Amravati Municipal Election 2026 Eknath Shinde Shiv Sena: शिवसेना सत्तेसाठी नाही, तर सर्वसामान्यांच्या वेदना दूर करण्यासाठी जन्माला आली आहे. विरोधकांना सत्तेची लालसा आहे. पण आम्हाला मालमत्तेच्या आकड्यांपेक्षा माणसांची नाती आणि लोकांचा विश्वास महत्त्वाचा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणांगणात आक्रमकपणे उतरायचे आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. मी कमी बोलतो पण जास्त काम करतो. शिवसैनिकांना खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांशी संवाद साधला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या नेहरू मैदानावर शिवसेनेची जाहीर प्रचारसभा मोठ्या उत्साहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

“लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा तुमच्या भावाचा शब्द आहे. कोर्टात अडथळे आणले गेले तरी महिलांच्या ताकदीमुळेच महायुतीला प्रचंड यश मिळाले. महिलांचा पाठिंबा म्हणजे विजयाची खात्री असते. नगरविकास मंत्री या नात्याने कचरा प्रकल्पावर निश्चित मार्ग काढला जाईल. अंडरग्राउंड वीजजाळे, शुद्ध पिण्याचे पाणी आणि भक्कम रस्ते आम्ही देणार आहोत," असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

"अमरावती महापालिकेसाठी गार्डन विकासाकरिता १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. भविष्यात आणखी तरतूद केली जाईल. रस्ते व पाणीपुरवठा योजनांसाठी नगरविकास विभागामार्फत निधी मंजूर झाला आहे. अमरावतीचा कायापालट करायचा असेल, विकासाचा भगवा फडकवायचा असेल, तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. १५ तारखेला मतदान नाही, तर अमरावतीच्या भविष्याचा फैसला होणार आहे," असेही शिंदे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : People's trust, not power, is the real crown: Shinde

Web Summary : Eknath Shinde emphasized public service over power during Amravati election campaigning. He promised continued support for women's schemes, infrastructure development including roads, water, and underground electricity. He urged voters to choose development by supporting Shiv Sena's 'bow and arrow' symbol.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Amravati Municipal Corporation Electionअमरावती महानगरपालिका निवडणूक २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना