शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 00:54 IST

महाराष्ट्राच्या विधिमंडळात रमी खेळताना सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांना मंत्रि‍पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती.

महाराष्ट्राच्या विधिमंडळात रमी खेळताना सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांना मंत्रि‍पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत कोकाटे यांच्याबाबत चर्चा करून गुरुवारी रात्री उशीरा अंतिम निर्णय जाहीर केला. त्यानुसार, मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. तर, भरणे यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्यांक विकास खाती कोकाटे यांना देण्यात आली आहे. 

माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदाची आतपर्यंतची कारकीर्द खूपच वादग्रस्त आहे. सातत्याने शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधाने केल्याने ते टीकेचे धनी ठरले होते. अशातच पावसाळी अधिवेशनात विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ वायरल झाला आणि त्यांना पदावरून हटवण्यात यावे, अशा मागणीने चांगलाच जोर धरला.  

दरम्यान, फडणवीस यांनी आज अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यासोबत माणिकराव कोकाटे यांच्या बाबत चर्चा केली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, कोकाटे यांचे मंत्रिपद टिकले असले तरी कृषिमंत्रीपद त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रेय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर भरणे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण खाते आता कोकाटे यांच्याकडे देण्यात आले. त्यामुळे पद सोडावे लागले असले तरी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश कायम ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुती