शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पितृछत्र हरपलेले ५५ विद्यार्थी घेतले दत्तक

By admin | Updated: July 11, 2014 08:46 IST

दहावीपर्यंतचा सर्व खर्च संस्था करणार

टेंभुर्णी : रोटरी क्लब आॅफ टेंभुर्णी व कामधेनू परिवार बावड यांनी पितृछत्र हरपलेले ५५ विद्यार्थी दत्तक घेतले आहेत़ दहावीपर्यंतचा सर्व खर्च या दोन्ही संस्था करणार आहेत़रविवारी रोटरी क्लब भवनमध्ये सकाळी ११ वाजता या सर्व दत्तक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले़ अध्यक्षस्थानी कामधेनू परिवाराचे अध्यक्ष डॉ़ लक्ष्मण आसबे होते़ या विद्यार्थ्यांमध्ये पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ ५५ पैकी १० विद्यार्थी टेंभुर्णी रोटरी क्लबने दत्तक घेतले आहेत़ कार्यक्रमास रोटरीचे अध्यक्ष अनिल मस्के, सचिव नागेश कल्याणी, माजी अध्यक्ष डॉ़ पांडुरंग गायकवाड, रमेश पाटील, प्रशांत गांधी, रावसाहेब देशमुख, दिलीप भोसले, गोरख खटके, अशोक खटके, रोटरीचे सदस्य महेश कोठारी, अनिल बाबर, वैभव गांधी, विनोद शिंदे, नागेश बोबडे, डॉ़ अमोल भोसले, दीपक व्यवहारे, श्रीकांत लोंढे, गणेश भणगे यांच्यासह कामधेनू परिवाराचे सदस्य उपस्थित होते़ निराधार विधवा महिलांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करण्याचे काम कामधेनू परिवार गेल्या चार वर्षांपासून करीत असल्याचे सांगून डॉ़ लक्ष्मण आसबे म्हणाले, चालू वर्षी ६५० विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे़ त्यासाठी अनेकांचे सहकार्यही मिळत आहे़ डॉ़ डी़ व्ही़ यांनी कामधेनू परिवाराच्या कामाची माहिती दिली़ प्रास्ताविक रोटरीचे माजी अध्यक्ष यशवंत हांडे यांनी केले़ सूत्रसंचालन संतोष मोटे यांनी तर आभार रमेश पाटील यांनी मानले़ ------------------------असा उपक्रम राबविणारा पहिलाच रोटरी क्लबविधवांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करणारा टेंभुर्णी रोटरी क्लब हा राज्यातील पहिला रोटरी क्लब असल्याचे डॉ़ लक्ष्मण आसबे यांनी सांगितले़दत्तक घेतलेल्या मुलांना १० वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च शिवाय गणवेश, जेवणाचा खर्च करण्यात येतो़दत्तक घेतलेल्या मुलांचा आणि त्यांच्या आईची मोफत वैद्यकीय तपासणी करण्याची जबाबदारी टेंभुर्णी येथील डॉ़ पांडुरंग गायकवाड, डॉ़ अमोल भोसले यांनी स्वीकारली़