शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

सेनामंत्र्यांचा अबोला

By admin | Updated: June 22, 2015 03:17 IST

शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांमधील परस्पर संवादाच्या अभावामुळे पक्षातील अनेक जण अस्वस्थ असून, मित्रपक्ष भाजपालाही सेना मंत्र्यांनी धरलेल्या ‘अबोल्या’मुळे डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.

संदीप प्रधान, मुंबईशिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांमधील परस्पर संवादाच्या अभावामुळे पक्षातील अनेक जण अस्वस्थ असून, मित्रपक्ष भाजपालाही सेना मंत्र्यांनी धरलेल्या ‘अबोल्या’मुळे डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यात आपापसात संवाद फारच कमी असल्याचे शिवसेनेच्याच काही मंत्र्यांचे मत आहे. मंत्रिमंडळ बैठकीकरिता एकमेकांच्या शेजारी बसूनही ते फारसे बोलत नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकत्र बसून स्ट्रॅटेजी पक्की करणे हे तर होतच नाही. मागील सरकारमध्ये कुठली भूमिका घ्यायची किंवा एखादा ताजा विषय कसा व कुणी उपस्थित करायचा याची व्यूहरचना निश्चित करीत. शिवसेनेत ज्येष्ठ मंत्र्यांमध्येच विसंवाद असल्याने अशी ठरवून भूमिका घेतली जात नाही.रावते व कदम हे दोघे विधान परिषदेचे सदस्य आहेत. रामदास कदम हे विधान परिषदेचे सदस्य झाल्यापासून उभयतांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला. निवडणुकीत सुभाष देसाई हे पराभूत झाले. त्यानंतरही त्यांना मंत्री केले व उद्योगासारखे सर्वांत महत्त्वाचे खाते दिल्याने रावते व कदम हे देसाई यांच्यावर नाराज आहेत. भाजपासोबतच्या वाटाघाटींमध्ये देसाईच सहभागी होत असल्याने तो मंत्र्यांमधील कटुतेचा पदर आहे.