शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 20:17 IST

"आज भाजपा एकनाथ शिंदे यांचे लोक फोडण्याचे काम करत आहे. पुढे काहीही होऊ शकते," असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र यातच, महायुतीतील नाराजीनाट्य समोर आले आहे. भाजपच्या स्थानिक पातळीवरील ऑपरेशन लोटस मुळे शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) मंत्र्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री शिंदे वगळता, त्यांचे मत्री मात्र गैरहजर राहिले. यासंदर्भात बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंत्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे वीस आमदार फुटत होते. पण त्यावेळी त्यांनी पॅचअप केले गेले. मात्र, त्यांच्यात अजूनही खदखद आहे," असा दावा चंद्रकांत खैरे यानी केला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

खैरे म्हणाले, "८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे वीस आमदार फुटत होते. परंतु त्यावेळी त्यांनी पॅचअप केले गेले. मात्र, त्यांच्यामध्ये अजूनही खदखद आहेच. आता जेव्हा त्यांना दिसून आले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आपल्याला निधी देत नाहीत, मग तिथून तो राग आणि रोष वाढला आणि यामुळे ते गडबड करायला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे, हे तेथे टिकू शकणार नाहीत. ते बाहेर पडतील अथवा बाहेर जावे लागेल." एवढेच नाही तर, "आज भाजपा एकनाथ शिंदे यांचे लोक फोडण्याचे काम करत आहे. पुढे काहीही होऊ शकते," असे चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले.

शिंदेंच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंंत्र्यांची भेट -महत्वाचे म्हणजे, मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी प्रत्येक पक्षाची प्री-कॅबिनेट होत असते. शिंदे गटाच्या प्री-कॅबिनेट बैठकीत शिवसेनेचे सगळे मंत्री उपस्थित होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला, उपमुख्यमंत्री शिंदे वगळता त्यांचे सर्व मंत्री अनुपस्थित राहिले. विशेष म्हणजे, कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन, त्यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय तोडगा निघाला? -मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीसंदर्भात बोलताना शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, "महायुतीतील जे घटक पक्ष आहेत, त्यांनी मित्रपक्षांचे कोणतेही नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक आपल्या पक्षात घेऊ नये, असे ठरले आहे. प्रदेशाध्यक्ष आणि इतर पक्षातील नेते बसून निर्णय घेतील. पण, सामोपचाराने तोडगा निघालेला आहे. कुणी कुणाला काहीही सुनावलेलं नाहीये. काही गोष्टी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही. काही कळत-नकळत घडतात. विसंवाद होऊ नये अशी सगळ्यांची भूमिका आहे."

 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde faction rift? Khair's claim: MLAs nearly defected months ago.

Web Summary : Shiv Sena (UBT) leader Khair claims Shinde's MLAs almost defected months ago due to internal strife and funding issues. He alleges BJP is poaching Shinde's members, potentially destabilizing the government, despite ministers meeting with Fadnavis.
टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे