शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१३/७ स्फोटांचा फायनान्सर अटकेत

By admin | Updated: July 17, 2014 02:27 IST

तीन वर्षांपूर्वी मुंबईत घडलेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांचा फायनान्सर अब्दुल मतीन दामदा फकी ऊर्फ फारूक याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गोव्यातील इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या मदतीने अटक केली.

मुंबई : तीन वर्षांपूर्वी मुंबईत घडलेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांचा फायनान्सर अब्दुल मतीन दामदा फकी ऊर्फ फारूक याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गोव्यातील इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या मदतीने अटक केली. मतीनने मुंबई स्फोटांसाठी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेला दुबईतून हवालामार्फत १० लाख रुपये धाडले होते.
१३ जुलै २०११ रोजी मुंबईत आॅपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि कबुतरखान्याजवळ बॉम्बस्फोट घडले होते. या स्फोटांचा मुख्य सूत्रधार मोहंमद अहमद सिद्धीबाप्पा ऊर्फ यासीन भटकळसह एकूण सात आरोपी गजाआड आहेत. या आरोपींच्या चौकशीतून मुजफ्फर कोला आणि मतीन या दोघांची नावे उघड झाली. तसेच मतीन हा मुजफ्फरचा मेहुणा असून, या दोघांनी हे बॉम्बस्फोट घडविण्यासाठी यासीन भटकळ आणि साथीदारांना लाखो रुपयांचे फायनान्स केल्याची माहिती समोर आली होती. एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटांचा कट शिजल्यानंतर मतीनने दुबईतून हवालामार्फत १० लाख रुपये दिल्लीतील ज्वेलर कन्वर पथीजा याच्याकडे पाठवले होते. यासीनने पथीजाकडून १० लाख घेतले होते. अटक आरोपींमध्ये कन्वरचा सहभाग असून मुजफ्फर, मतीन यांच्यासह एकूण सात आरोपी फरार होते. या सातही आरोपींविरोधात विशेष मोक्का न्यायालयाने अजामीनपात्र वॉरन्ट जारी केले तसेच या सर्वांविरोधात देशभरातील सर्व विमानतळांवर लूक आऊट सर्क्युलरही जारी करण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक विमानळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्याकडे स्फोटातील सातही फरार आरोपींचे फोटो आणि तपशील होते. दरम्यान, मतीन सोमवारी दुबईहून गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानळावर उतरला. विमानतळावर उतरून घाईघाईने बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्या मतीनला तेथील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ओळखले. लगोलग त्याला ताब्यात घेण्यात आले.
एटीएस अधिकाऱ्यांना कळवून मतीनला दांबोली विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात
आले. एटीएसने त्याला मुंबईत आणून अटक केली. (प्रतिनिधी)