शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

कोण आहेत बालयोगी उमेशनाथ महाराज? भाजपाने दिली राज्यसभेची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 2:28 PM

उमेशनाथ महाराज काँग्रेस सरकारमध्ये दर्जाप्राप्त राज्यमंत्री होते.

RajyaSabha Election 2024 : येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभानिवडणूक होणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने जाहीर केलेल्या नावात उज्जैनच्या वाल्मिकी धामचे पीठाधीश्वर बालयोगी उमेशनाथ महाराज यांचेही नाव आहे. महाराजांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर उज्जैनच्या वाल्मिकी धाम येथे जल्लोषाचे वातावरण आहे. 

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची गुरुवार शेवटची तारीख आहे. त्यामुळेच त्यांचे बुधवारी नाव जाहीर करण्यात आले आहे. धर्म आणि अध्यात्माशी निगडित बालयोगी उमेशनाथ महाराज यांचा राजकारणाशीही जुना संबंध आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा होता. सिंह त्यांना आपले गुरुही मानतात.

अमित शहा आणि संघ प्रमुखांच्या जवळचेकाँग्रेससोबतच बालयोगी उमेशनाथ महाराज हे भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाशीही जोडले गेले आहेत. संघप्रमुख मोहन भागवत असोत वा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उज्जैन या धार्मिक नगरीत आलेले कोणीही त्यांना भेटल्याशिवाय जात नाही. अशी माहिती आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान वाल्मिकी धामला भेट देणार होते, परंतु काही कारणास्तव जाऊ शकले नाहीत.

राम मंदिराच्या भूमिपूजनात सहभागी सिंहस्थादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उज्जैनला आले असता त्यांनी बालयोगी उमेशनाथ महाराज आणि इतर संतांची भेट घेतली होती. तसेच, उमेशनाथ महाराज मध्य प्रदेशातील एकमेव संत आहेत, ज्यांना श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचे निमंत्रण मिळाले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचेही त्यांना निमंत्रण होते.

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणMadhya Pradeshमध्य प्रदेश