शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

बलात्कारप्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास; लातूर अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचा निकाल

By राजकुमार जोंधळे | Published: September 13, 2023 10:57 PM

आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. याबाबत घरी अथवा इतर काेणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. आराेपीने पीडित मुलीसाेबत सतत शारीरिक संबंध ठेवले. अखेर याबाबत मुलीने आई-वडिलांना घडला प्रकार सांगितला होता. 

लातूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आराेपीला २० वर्षांचा सश्रम कारावास व एक हजाराच्या दंडाची शिक्षा लातूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश बी.सी. कांबळे यांनी बुधवारी सुनावली. पीडित मुलीच्या लातुरातील राहत्या घरी नातेवाईक आरोपी सागर बाबासाहेब ऊर्फ धनंजय सूर्यवंशी आणि पत्नी हे नोकरीनिमित्त राहण्यासाठी आले हाेते. दरम्यान, २०१९ मध्ये पीडित मुलगी इयत्ता नववीत शिकत होती. पीडितेला शाळेत सोडण्यासाठी आणि शाळेतून घरी नेण्यासाठी आरोपी हा दुचाकीवरून जात हाेता. आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. याबाबत घरी अथवा इतर काेणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. आराेपीने पीडित मुलीसाेबत सतत शारीरिक संबंध ठेवले. अखेर याबाबत मुलीने आई-वडिलांना घडला प्रकार सांगितला होता. 

याबाबत एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोउपनि. गणेश कदम, विशाल कोडे, सुजाता कसपटे यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करून, न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. लातूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश बी.सी. कांबळे यांनी आराेपीला शिक्षा सुनावली. खटल्यात पीडित मुलीचा जबाब, साक्षीदारांची साक्ष याआधारे आरोपीला दाेषी ठरवले.

या प्रकरणात विशेष शासकीय अभियोक्ता मंगेश महेंद्रकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली. त्यांना जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांनी सहकार्य केले. तपास अधिकारी पोउपनि. गणेश कदम, पैरवी ज्योतीराम माने, महिला पोलिस अंमलदार कलमुकले यांनी केली. या खटल्यात पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी प्रकरणावर लक्ष ठेवून मार्गदर्शन केले.

११ साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली... -यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदवली असून, सरकार पक्षाची साक्ष ग्राह्य धरून लातूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने आरोपी सागर बाबासाहेब ऊर्फ धनंजय सूर्यवंशी (३२, रा. निलंगा, जि. लातूर) याला दोषी ठरवत कलम ३७६,(२), ३५४, ५०६ भादंवि आणि बाललैंगिक अत्याचार अधिनियम कलम ६, ८, १२ प्रमाणे २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLife Imprisonmentजन्मठेपCourtन्यायालय