शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज मोटेगावकरला अटक: का आणि कशी झाली कारवाई? CBI तपासातील ५ मोठे खुलासे समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 16:18 IST

९ तास घरात झाडाझडती अन् पुण्यात ११ तास मॅरेथॉन चौकशी; पुरावे डिलीट करण्याचा मोटेगावकरांचा प्रयत्न सीबीआयने उधळला!

लातूर : देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात 'आरसीसी' क्लासेसचे संस्थापक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मोटेगावकर याच्या अटकेमागील नेमकी कारणे काय आहेत आणि सीबीआयने अत्यंत गुप्ततेने ही कारवाई कशी केली, याचा धक्कादायक उलगडा आता सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून झाला आहे.

मोटेगावकरला अटक का झाली? ५ प्रमुख कारणे
सीबीआयने न्यायालयात आणि तपासादरम्यान मोटेगावकर यांच्यावर अत्यंत गंभीर ठपके ठेवले आहेत:
१. संघटित रॅकेटमध्ये सहभाग: नीट पेपरफुटीचे देशभरात संघटित रॅकेट चालवणाऱ्या आंतरराज्य टोळीमध्ये प्रा. मोटेगावकर हा सक्रिय सहभागी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष सीबीआयने काढला आहे.
२. मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका: मोटेगावकर याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल आणि डिजिटल पुराव्यांवरून त्यांना नीट परीक्षेचा मुख्य पेपर परीक्षेच्या आधीच मिळाला होता, हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये परीक्षेचे प्रश्न आणि अधिकृत उत्तरपत्रिका आढळून आली आहे.
३. पेपर सेटरशी थेट कनेक्शन: नीट परीक्षेचे अधिकृत पेपर सेटर प्रा. पी.व्ही. कुलकर्णी याच्याशी मोटेगावकरचे थेट लागेबंधे होते आणि त्यांच्याच माध्यमातून हा पेपर लीक झाल्याचे समोर आले आहे.
४. माहिती डिलीट करण्याचा प्रयत्न: सीबीआयचा छापा पडणार याची कुणकुण लागताच मोटेगावकरने आपल्या मोबाईलमधील प्रश्नसंच, पीडीएफ आणि इतर महत्त्वाचे पुरावे डिलीट करून नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, जो सीबीआयने फॉरेन्सिक तपासाद्वारे उघड केला.
५. पुढील साखळी लपवली: हा मिळालेला गोपनीय पेपर मोटेगावकरने पुढे नक्की कोणत्या विद्यार्थ्यांना, पालकांना किंवा एजंटना दिला? आणि त्या बदल्यात किती कोटींची उलाढाल झाली, हे सांगण्यास त्याने नकार दिला. ही 'लास्ट माईल साखळी' शोधण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.

अटकेचा थरार: सीबीआयने कशी केली कारवाई?
मोटेगावकर याच्या अटकेची प्रक्रिया सीबीआयने अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केली
१५ मे (लातूरमध्ये ९ तास चौकशी): सीबीआयच्या पथकाने सर्वप्रथम १५ मे रोजी लातूर येथील मोटेगावकर याच्या निवासस्थानी धडक दिली होती. तिथे जवळपास ९ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या छाप्यात सीबीआयने आरसीसीच्या सराव प्रश्नपत्रिका, मोटेगावकर यांचा वैयक्तिक मोबाईल आणि इतर महत्त्वाचे डिजिटल दस्तऐवज जप्त करून पथक रवाना झाले होते.
१७ मे (पुण्यात ११ तास मॅरेथॉन चौकशी अन् अटक): लातूरमधील पुराव्यांच्या आधारे सीबीआयने मोटेगावकरला पुण्याच्या कार्यालयात पाचारण केले होते. त्यानुसार रविवारी (१७ मे) ते पुणे सीबीआय कार्यालयात हजर झाले. तिथे अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या मोबाईल डेटाचा दाखला देत त्याची तब्बल ११ तास मॅरेथॉन चौकशी केली. जबाबात कमालीची विसंगती आढळल्यानंतर आणि गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर सीबीआयने त्याला अधिकृतपणे अटक करून न्यायालयात हजर केले.

English
हिंदी सारांश
Web Title : NEET Paper Leak: Coaching Class Founder Arrested, CBI Reveals Details

Web Summary : NEET paper leak case: CBI arrested RCC Classes founder Motegaonkar for involvement in organized racket, possessing leaked paper, and deleting evidence. He's linked to paper setter, withholding info on beneficiaries. Arrest followed questioning and evidence from seized devices.
टॅग्स :NEET Exam Paper Leakनीट परीक्षा पेपर लीकlaturलातूरCBIसीबीआय