वडिलांना तिकीट नाकारल्याने मुलाचे विचित्र कृत्य; NCP आमदाराच्या कार्यालयाबाहेर केली लघवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:40 IST2026-01-22T15:39:36+5:302026-01-22T15:40:33+5:30

Maharashtra Zilla Parishad Election 2026: लातूर जिल्ह्यातील या घटनेची राज्यभर चर्चा.

Maharashtra Zilla Parishad Election 2026: Son's strange act after father denied ticket; Urinated outside MLA Sanjay Bansode's office | वडिलांना तिकीट नाकारल्याने मुलाचे विचित्र कृत्य; NCP आमदाराच्या कार्यालयाबाहेर केली लघवी

वडिलांना तिकीट नाकारल्याने मुलाचे विचित्र कृत्य; NCP आमदाराच्या कार्यालयाबाहेर केली लघवी

Maharashtra Zilla Parishad Election 2026: महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच, उमेदवारी न मिळाल्याच्या निषेधार्थ माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार संजय बनसोडे यांच्या लातूर शहरातील कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने लघवी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

तिकीट न दिल्याने तरुण संतापला

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी(21 जानेवारी 2026) रोजी घडली असून, उदगीर तालुक्यातील या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. उदगीरच्या निळेबन मतदारसंघातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मधुकर एकुरकेकर यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने हा निषेध झाल्याचे सांगितले जात आहे. तिकीट नाकारल्याच्या रागातून मधुकर एकुरकेकर यांचा मुलगा नितीन याने आपला निषेध नोंदवण्यासाठी हा विचित्र मार्ग अवलंबला. 

‘अन्याय केल्याचा’ आरोप

नितीन एकुरकेकरने पक्ष नेतृत्वावर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आमदार बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर लघवी केल्याचा व्हिडीओ त्याने स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला होता. मात्र, वाद निर्माण झाल्यानंतर संबंधित व्हिडीओ हटवण्यात आला.

समर्थकांचा दावा

मधुकर एकुरकेकर यांच्या समर्थकांचा दावा आहे की, त्यांनी अनेक वर्षे स्थानिक पातळीवर प्रामाणिकपणे काम केले असतानाही पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचेही समर्थकांचे म्हणणे आहे.

Web Title : पिता को टिकट न मिलने पर बेटे ने NCP नेता के कार्यालय पर किया पेशाब

Web Summary : ज़िला परिषद चुनाव में पिता को उम्मीदवारी न मिलने से नाराज़ बेटे ने लातूर में NCP विधायक संजय बनसोडे के कार्यालय के बाहर पेशाब कर दिया। अन्याय के विरोध में की गई इस घटना का वीडियो वायरल होने के बाद विवाद खड़ा हो गया। समर्थकों का दावा है कि समर्पित सेवा के बावजूद पिता को अनुचित तरीके से अनदेखा किया गया।

Web Title : Son urinates outside NCP leader's office after father denied ticket.

Web Summary : Upset over his father's denied candidacy for Zilla Parishad elections, a man urinated outside NCP MLA Sanjay Bansode's office in Latur. The incident, protesting injustice, sparked controversy after the video went viral. Supporters claim the father was unfairly overlooked despite dedicated service.