शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकस्पॉटवर पोलिसांची लक्षवेधी जनजागृती; अपघातग्रस्त कार हायवेवर टांगली, वेग झाला कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:03 IST

सावधान! अती वेग आणि सीटबेल्टचा अभाव ठरला जीवघेणा; पोलिसांनी थेट महामार्गावर अपघातग्रस्त कार टांगून दिला काळजाला भिडणारा संदेश.

-महेबूब बक्षी

औसा (जि. लातूर): वेग आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून औसा पोलिसांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ६ मार्च रोजी रात्री औसा-तुळजापूर महामार्गावर एका भरधाव बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात होऊन चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे चौघांना आपला जीव गमवावा लागला, हे तपासात समोर आले होते.

अपघाताची कार बनली 'इशारा'हाच जीवघेणा निष्काळजीपणा वाहनधारकांच्या नजरेत भरण्यासाठी पोलिसांनी तीच अपघातग्रस्त कार चार लोखंडी खांबांच्या सहाय्याने महामार्गालगत हवेत टांगली आहे. शेजारीच लावलेल्या माहिती फलकावर "सीटबेल्ट नाही वापरला म्हणून चौघांचा जीव गेला" असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. हा दृश्यात्मक संदेश पाहून महामार्गावरून ये-जा करणारे वाहनधारक सावध होत असून अनेकांकडून वेगावर नियंत्रण मिळवले जात असल्याचे चित्र दिसत आहे.

ब्लॅकस्पॉटवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नऔसा एमआयडीसी ते वानवडा मोड हा भाग 'ब्लॅकस्पॉट' म्हणून ओळखला जातो, जिथे आतापर्यंत ५० पेक्षा अधिक जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मात्र, पोलिसांच्या या नाविन्यपूर्ण जनजागृतीनंतर या भागातील अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात घटले असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

अती वेग टाळा"जीवन अनमोल आहे. एक छोटीशी चूक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकते. अती वेग टाळा आणि सीटबेल्टचा वापर करा. वाहतूक नियमांचे पालन करणे हीच काळाची गरज आहे."— रेवन डमाले, पोलीस निरीक्षक, औसा.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Police's Awareness: Crashed BMW Hung on Highway; Speed Reduced

Web Summary : Latur police hung a crashed BMW on the highway to raise awareness about road safety after a fatal accident. The initiative aims to reduce accidents caused by speeding and neglecting seatbelts, especially in a known blackspot, and has already shown positive results by reducing accidents.
टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसlaturलातूर