शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

सीमाभागातील ८६५ गावांतील मराठी भाषिकांवर अन्याय, सवलतींसाठी महाराष्ट्र शासनाला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 07:15 IST

Maharashtra : उदगीर, निलंगा, उमरगा या तालुक्यांचा बराच मोठा भाग औराद (संतपूर), भालकी, हुमनाबाद आणि बसवकल्याण तालुक्याला जोडला गेला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांचा भूभाग आजतागायत कर्नाटकात आहे.

लातूर : कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावामधील मराठी भाषिक बांधवांवर वर्षानुवर्षे अन्याय होत असून, त्याकडे महाराष्ट्र शासनाने अधिकचे लक्ष द्यावे. पूर्वीप्रमाणेच सीमाभागातील विद्यार्थ्यांना ईबीसी सवलतीसह विविध सुविधा द्याव्या, अशी मागणी बिदर जिल्ह्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष रामराव राठोड बोंथीकर यांनी केली आहे.उदगीर, निलंगा, उमरगा या तालुक्यांचा बराच मोठा भाग औराद (संतपूर), भालकी, हुमनाबाद आणि बसवकल्याण तालुक्याला जोडला गेला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांचा भूभाग आजतागायत कर्नाटकात आहे. १९५१ च्या शिरगणतीप्रमाणे बिदर जिल्ह्यात ३९ टक्के मराठी भाषिक तर कानडी २८ टक्के, तेलुगू १५ टक्के, उर्दू १५ टक्के व इतर १३ टक्के असे प्रमाण होते. आजही या भागातील बहुतांश मराठी बांधवांवर अन्याय होत आहे. त्यामुळे न्याय्य हक्कासाठी जनतेच्या लढ्याची महाराष्ट्राने दखल घ्यावी, अशी मागणी करीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे बिदर जिल्हाध्यक्ष रामराव राठोड यांनी महाराष्ट्र शासनाला निवेदन दिले आहे. त्यानुसार ८६५ गावातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन यापूर्वी देत असलेली ईबीसी सवलत पूर्ववत करावी, या गावातील नागरिकांना राज्य शासनाच्या सर्व सवलती, सोयी व अधिकार द्यावेत; शालेय शिक्षण, उच्च शिक्षणासाठी दिलेल्या आरक्षणाची टक्केवारी एकीकरण समितीच्या मागणीप्रमाणे वाढवावी, अशी मागणी केली आहे. तसेच सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांसाठी वाचनालय, एकीकरण समितीच्या पदसिद्ध पदाधिकाऱ्यांना मुंबई दौऱ्याच्या वेळी आमदार निवासात राहण्याची व्यवस्था करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :marathiमराठीlaturलातूरKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र