कारसह साडेआठ लाखांचा गुटखा पकडला; एकाला अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: April 18, 2026 21:53 IST2026-04-18T21:53:37+5:302026-04-18T21:53:59+5:30

विशेष पोलिसांची कारवाई : कासार शिरसी परिसरात घटना

Gutkha worth Rs 8.5 lakh seized along with car; one arrested | कारसह साडेआठ लाखांचा गुटखा पकडला; एकाला अटक

कारसह साडेआठ लाखांचा गुटखा पकडला; एकाला अटक

राजकुमार जाेंधळे

राजकुमार जाेंधळे / लातूर : गुटख्याची चाेरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या एकाला तब्बल ८ लाख ५९ हजार ५६० रुपयांच्या मुद्देमालासह पकडण्यात आले. ही कारवाई विशेष पाेलिस पथकाने कासार शिरसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केली. याबाबत कासार शिरसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले की, शनिवार, १८ एप्रिल रोजी सकाळी ९:४५ वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून गुटख्याची चाेरट्या मार्गाने वाहतूक हाेत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची पडताळणी केल्यानंतर पथकाने कासार शिरसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत तांबाळा पाटी येथे सापळा लावला. संशयास्पद वाटणारी पांढऱ्या रंगाची कार (एमएच २४ सीडी ३५९३) पाेलिसांनी अडवली. कारची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा, पानमसाला आढळला.
यावेळी पोलिसांनी वाहनचालक मालक संजय काशिनाथ कन्ना (वय ४५, रा. उस्तुरी, ता. निलंगा) याला ताब्यात घेतले. या कारवाईत २ लाख ५९ हजार ५६० रुपयांचा अन्नसाठा जप्त केला. गुन्ह्यात वापरलेली ६ लाखांची कार जप्त करण्यात आली. याबाबत कासार शिरसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक अमाेल तांबे यांच्या पथकातील प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी अक्षय जाधव, पोउपनि. आयुब शेख, पोउपनि. उत्तम जाधव, रामहरी भोसले, यशवंत घुगे, कासार शिरसी ठाण्याचे सपोनि. गर्जे, अंमलदार तपसे, नागमोडे यांच्या पथकाने केली.

Web Title : कार सहित साढ़े आठ लाख का गुटखा जब्त; एक गिरफ्तार

Web Summary : लातूर के कासार शिरसी में पुलिस ने साढ़े आठ लाख रुपये का गुटखा और एक कार जब्त की, एक व्यक्ति गिरफ्तार। विशेष पुलिस दल ने गुप्त सूचना पर कार्रवाई करते हुए प्रतिबंधित पदार्थ ले जा रही कार को रोका। मामला दर्ज।

Web Title : Gutka Worth ₹8.5 Lakh Seized with Car; One Arrested

Web Summary : Police seized gutka worth ₹8.5 lakhs and a car in Kasar Shirsi, arresting one person. The special police team acted on a tip, intercepting a car transporting the banned substance. A case has been registered.