शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाच्या थकीत हप्त्यासाठी नगरसेवकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 17:25 IST

तालुक्यातील चवंडा नगर व इतर भागातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजेनअंतर्गत तिसरा, चौथा आणि पाचवा हप्ता वर्षभरापासून मिळाला नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत़. त्यामुळे थकित हप्ते देण्यात यावेत, यासह इतर मागण्यांसाठी नगरसेवक सरवरलाल सय्यद, अभय मिरकले यांनी पालिकेसमोर गुरुवारी धरणे आंदोलन केले़.

अहमदपूर  : तालुक्यातील चवंडा नगर व इतर भागातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजेनअंतर्गत तिसरा, चौथा आणि पाचवा हप्ता वर्षभरापासून मिळाला नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत़. त्यामुळे थकित हप्ते देण्यात यावेत, यासह इतर मागण्यांसाठी नगरसेवक सरवरलाल सय्यद, अभय मिरकले यांनी पालिकेसमोर गुरुवारी धरणे आंदोलन केले़.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला़. त्यामुळे बहुतांश लाभार्थ्यांनी कर्ज, ऊसनवारी करुन घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले़. परंतु त्यानंतरचे उर्वरित तीन हप्ते वर्षभरापासून मिळाले नाहीत़. त्यामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत़. थकित हप्ते देण्यात यावेत, या मागणीसाठी नगरसेवक सरवरलाल सय्यद, अभय मिरकले यांनी पालिकेसमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे़.

आ. बाबासाहेब पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली़ आणि लवकरच मागण्या सोडविण्यात येतील, असे पत्र आंदोलनकर्त्यांना पालिकेच्या वतीने दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, नगरसेवक सरवरलाल सय्यद, अभय मिरकले, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास महाजन, नगरसेवक राहुल शिवपुजे, नगरसेवक ताजोद्दीन सय्यद, चंद्रकांत पुणे, प्रशांत भोसले, जावेद बागवान, सुनील डावरे, सादिक चाऊस, पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :agitationआंदोलनprime ministerपंतप्रधानMarathwadaमराठवाडा