शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

गृह विलगीकरणात राहून ९० वर्षीय चव्हाण दाम्पत्याची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST

सिद्राम जेमला चव्हाण (वय ९०) आणि भुराबाई सिद्राम चव्हाण (८७) असे कोरोनावर मात केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. रेणापूर तालुक्यातील ...

सिद्राम जेमला चव्हाण (वय ९०) आणि भुराबाई सिद्राम चव्हाण (८७) असे कोरोनावर मात केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. पोहरेगाव व तांड्यावर आतापर्यंत दीडशेच्या जवळपास कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. पोहरेगाव तांडा येथील सिद्राम चव्‍हाण व त्यांची पत्नी भुराबाई चव्हाण यांना ७ एप्रिल रोजी ताप, अंगदुखी, डोकेदुखी असा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी पोहरेगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तेथील डॉक्टरांना सांगितले. तेव्हा कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने कोविड चाचणी करण्यात आली. तेव्हा दाेघांनाही कोविड झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यातच सिद्राम चव्हाण यांना दमा आणि मधुमेहाचा आजार. ही माहिती कुटुंबीयांना समजली. त्यामुळे गावात व तांड्यावर भीतीचे वातावरण पसरले. कुटुंबीयांना तर अश्रू आवरेनात. मात्र, या दाम्पत्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एन. कुलकर्णी व डॉ. बिभीषण जाधव यांनी समजावून सांगितले. त्यानंतर गोळ्या, औषधे देऊन ती कशी घ्यायची हे सांगितले आणि त्यांना गृह विलगीकरणात राहण्यास सांगितले. डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे या दाम्पत्याने १८ दिवस गृह विलगीकरणात राहून उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मात करीत ठणठणीत झाले आहेत.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राहिलो...

कोरोना झाल्याचे समजताच कुटुंबात रडण्यास सुरुवात झाली. तेव्हा जावई शरद राठोड यांनी या आजारासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर डॉक्टरांनी गोळ्या, औषधे देऊन आराम करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी मनातील भीती दूर केली. त्यामुळे आम्हीही धैर्य सोडले नाही. १८ दिवस वेगळे राहून कोरोनावर मात केली असल्याचे सिद्राम चव्हाण यांनी सांगितले.