लातूर : देवदर्शनासाठी लातूरहुन हरियानामधील हिसार येथे निघालेल्या मिनीबसला राजस्थानमध्ये नागोर जिल्ह्यात अपघात झाला. त्यात पाच जण ठार झाले आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}शनिवारी पहाटे ही घटना घडली. त्यानंतर लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नागोरचे जिल्हाधिकारी दिनेश कुमार यादव यांच्याशी संपर्क साधला. सदरील अपघातामध्ये लातूर जिल्ह्यातील याकतपुर (ता. औसा) येथील पाच जण ठार झाले आहेत. अपघातग्रस्त मिनीबस नागोर जिल्ह्यातून जात असताना रस्त्यात जनांवरे आल्याने त्यांना वाचविताना हा भयंकर अपघात घडला आहे. यामध्ये एकूण १३ जण ठार तर १० जण जखमी आहेत. त्यात लातूर जिल्ह्यातील पाच जण आहेत. मृतांची व जखमींची नावे तसेच ओळख पाठविण्याचे काम सुरू आहेत.
( सविस्तर वृत्त लवकरच )