शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद मतदारसंघ पुनर्रचना राजकीय दबावामुळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : निपाणी विधानसभा मतदारसंघात नवीन तालुका पंचायत व जिल्हा पंचायत मतदारसंघांची पुनर्रचना सुरू आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

निपाणी : निपाणी विधानसभा मतदारसंघात नवीन तालुका पंचायत व जिल्हा पंचायत मतदारसंघांची पुनर्रचना सुरू आहे. या संदर्भातील बातम्या वृत्तपत्रांमधून प्रसारित झाल्या आहेत. या मतदारसंघ पुनर्रचनेत मार्गदर्शक सूचनांचे पालन झालेले नाही. मार्गदर्शक सूचना डावलण्यात आल्या असून, राजकीय दबावामुळेच विसंगती असलेले हे नवीन मतदारसंघ तयार करण्यात आले आहेत, असा आरोप माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केला. निपाणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद मतदारसंघात २५ ते ३० हजार लोकसंख्या व भौगोलिक संलग्नता असणे आवश्यक आहे. पण या सूचना धाब्यावर बसवून मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली आहे. काही अपवाद वगळता सर्वच जिल्हा परिषद मतदार संघांमध्ये विसंगती आहे. कुरली जिल्हा पंचायत मतदारसंघात आडी, आप्पाचीवाडी, सिदनाळ या पंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. हे हास्यास्पद आहे. यामध्ये भौगोलिक संलग्नता दिसत नाही. कोगनोळी मतदारसंघाचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळे हे मतदारसंघ राजकीय दबावातून तयार झाले आहेत.

निपाणी मतदारसंघात एकूण २४ तालुका पंचायत मतदारसंघ होते परंतु गोठवून ते १६ करण्यात आले आहेत. वास्तविक या भागाचे आमदार मंत्री व त्यांचे पती खासदार असताना त्यांना २४ मतदारसंघ ठेवणे शक्य होते. पण त्यांनी तसे केले नाही. या सर्व प्रकारावर जिल्हाधिकारी व राज्य निवडणूक आयोगाशी संपर्क साधला असून, प्रस्ताव आल्यानंतर पडताळणी करू, असे आयोगाने म्हटल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो : २० काकासाहेब पाटील