Kolhapur News: पोहायला येत असल्याचे सांगून दोघे मित्र तलावात उतरले; एक बुडाला, एक वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:51 IST2026-05-18T13:51:40+5:302026-05-18T13:51:57+5:30

सिंह कुटुंबीय दोन वर्षांपूर्वी बिहारमधून कोल्हापुरात उदरनिर्वाहासाठी आले आहेत

Youth dies after drowning in swimming pool in Kolhapur | Kolhapur News: पोहायला येत असल्याचे सांगून दोघे मित्र तलावात उतरले; एक बुडाला, एक वाचला

Kolhapur News: पोहायला येत असल्याचे सांगून दोघे मित्र तलावात उतरले; एक बुडाला, एक वाचला

कोल्हापूर : पोहायला येत असल्याचे सांगून चार मित्रांसोबत गेलेल्या एका महाविद्यालयीन तरुणाचा जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अभिनंदनकुमार राजेशकुमार सिंह (वय १८, रा. न्यू शाहूपुरी, कोल्हापूर, मूळ रा. खाटापूर, जि. दरभंगा, बिहार) असे त्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला.

पोलिसांनी सांगितले की, अभिनंदन न्यू शाहूपुरीत कुटुंबीयांसोबत राहत होता. तो दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. त्याने ताराबाई पार्क परिसरातील महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला होता. त्यासह खासगी कोचिंग क्लासेसही लावला होता. तो संपल्यानंतर चार मित्रांनी पोहायला जाण्याचे ठरविले.

ते चौघेही मंगळवार पेठेतील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या जलतरण तलावात आले. त्यांनी संबंधित प्रशिक्षकांना पोहायला येत असल्याचे सांगून तिकीट घेतले. पाण्याची अधिक खोली असलेल्या ठिकाणी या चौघांनी उडी मारली. त्या वेळी अन्य जलतरणपटूही पोहत होते. चौघांनाही पोहता येत नसल्याने अवघ्या दोन मिनिटांत त्यांनी आरडाओरडा सुरू केला.
 
त्यात प्रशिक्षकांसह अन्य काही जणांनी दोघांना बाहेर काढले. मात्र, अभिनंदन कुठेच न दिसल्याने त्याचा शोध घेऊन त्याला बाहेर काढले. तो बेशुद्धावस्थेत होता. एका खासगी वाहनाने त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अन्य तीन मित्रांना त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच धक्का बसला.

नातेवाइकांनी फोडला हंबरडा

वडील राजेशकुमार खासगी नोकरी करतात. दोन वर्षांपूर्वी ते बिहारमधून कोल्हापुरात उदरनिर्वाहासाठी आले आहेत. त्यांना ही घटना समजल्यानंतर धक्काच बसला. ते कुटुंबियांसोबत सीपीआरला आले. आई, वडिलांसह नातेवाइकांनी सीपीआरच्या दारात हंबरडा फोडला. अभिनंदन याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

जलतरण तलावासमोर मोठी गर्दी

ही घटना झाल्यानंतर शिवाजी स्टेडियम समोर नागरिकांची मोठी गर्दी झाली. स्टेडियममध्ये व्यायामासाठी आलेल्या तरुणांसह बघ्यांनी या ठिकाणी गर्दी केली.

जलतरण तलावात पाच फुटांच्या पुढे डेंजर झोन असल्याच्या सूचना दर्शविल्या आहेत. प्रशिक्षकही पोहायला येणाऱ्यांना सूचना करतात. त्या मुलांनी पोहायला येत असल्याचे सांगितले. प्रशिक्षकांसह अन्य जलतरणपटूंनी मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. - विद्या शिरस, जिल्हा क्रीडाधिकारी

Web Title : कोल्हापुर: तैरना जानने का दावा करने पर कॉलेज छात्र की पूल में डूबने से मौत

Web Summary : कोल्हापुर के शिवाजी स्टेडियम के स्विमिंग पूल में तैरना जानने का दावा करने के बाद एक कॉलेज छात्र डूब गया। वह और तीन दोस्त गहरे पानी में उतर गए। जबकि अन्य को बचा लिया गया, वह बेहोश पाया गया और अस्पताल में उसकी मौत हो गई। परिवार शोक में डूबा हुआ है।

Web Title : Kolhapur: Claiming to know swimming, college student drowns in pool.

Web Summary : A college student drowned in Kolhapur's Shivaji Stadium swimming pool after claiming to know how to swim. He and three friends entered the deep end. While others were rescued, he was found unconscious and died in hospital. Family mourns the loss.