कोल्हापुरात प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार, तरुण घरातून फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 13:18 IST2021-09-17T13:10:49+5:302021-09-17T13:18:42+5:30

या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी तिच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. तर, गोळीबार करणाऱ्या त्या युवकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Young woman shot dead in Kolhapur over love affair | कोल्हापुरात प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार, तरुण घरातून फरार

कोल्हापुरात प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार, तरुण घरातून फरार

ठळक मुद्दे या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून चौकशीसाठी संबंधित युवतीला ताब्यात घेतले आहे. 

कोल्हापूर : शहरातील कळंबा तलाव परिसरात शुक्रवारी सकाळी एका युवकाने प्रेमप्रकरणतून एका युवतीवर गोळीबार केला. छराच्या बंदुकीतून हा गोळीबार झाल्याची चर्चा गावांमध्ये सुरू झाली. त्यानंतर ही बाब पोलिसांपर्यंत पोहचली. या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून चौकशीसाठी संबंधित युवतीला ताब्यात घेतले आहे. 

या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी तिच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. तर, गोळीबार करणाऱ्या त्या युवकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पण त्याने राहत्या घरातून पलायन केल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. गोळीबार झाला की नाही, याबाबत पोलीस तपास करत आहेत. संबंधित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी रुग्णालयात नेले आहे. गोळीबाराबाबत पोलीस अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.
 

Web Title: Young woman shot dead in Kolhapur over love affair