शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यंदाची जयंतीही अपूर्ण जन्मस्थळातच...

By admin | Updated: June 15, 2014 01:48 IST

राधानगरी धरणाच्या प्रतिकृतीसह बाह्य परिसराचा विकास होणे अद्याप बाकी

राजर्षी शाहू जयंती : धरणाच्या प्रतिकृतीसह बाह्य परिसराची कामे बाकी; म्युझिअमच्या आराखड्यावर निर्णयच नाही कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून रखडत-रखडत सुरू असलेल्या कामांमुळे यंदाही राजर्षी शाहू महाराजांची जयंती अपूर्ण असलेल्या शाहू जन्मस्थळातच करावी लागणार आहे. जन्मस्थळाच्या इमारती पूर्ण झाल्या असल्या तरी राधानगरी धरणाच्या प्रतिकृतीसह बाह्य परिसराचा विकास होणे अद्याप बाकी आहे. इमारतीत उभारण्यात येणाऱ्या म्युझिअमच्या आराखड्यावर अद्याप निर्णयच झालेला नसल्याचे समजते. शाहू जन्मस्थळ नूतनीकरणाला आॅगस्ट २०१२ मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीपासून वादांची पार्श्वभूमी आणि संथगतीने चाललेले काम यामुळे यंदाचे तिसरे वर्ष चालू असले तरी जन्मस्थळाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. सध्या जन्मस्थळाच्या ए, बी, सी, डी या मुख्य चार व प्रवेशद्वाराजवळच्या इमारती पूर्ण झाल्या आहेत. मुख्य इमारतीच्या पश्चिमेला ग्रंथालयासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीत फरशी घालण्याचे कामही तीन-चार दिवसांत संपणार आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असलेली कामे आता पूर्ण झाली आहेत. बाह्य परिसरात प्रवेशद्वारापासून ते पूर्ण परिसरात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने दगडी रस्ता करण्यात आला आहे. मात्र, राधानगरी धरणाच्या प्रतिकृतीचे बांधकाम अद्यापही पूर्ण होणे बाकी आहे. या धरणाचा दर्शनी भाग तयार असून त्याचे फॅब्रिकेशन, स्वयंचलित दरवाजे बनवणे अशा वाढीव कामांसाठी पुरातत्व खात्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे १ कोटी ३६ लाखांचा निधी वर्ग केला आहे. जन्मस्थळाच्या नूतनीकरणासाठी लागणारा निधी पुरविण्यात शासनाने हात आखडता घेतलेला नाही. मागणी करताच निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, संथगतीने चाललेले काम, वाद आणि अन्य तांत्रिक मुद्दे यांमुळे किमान आणखी एक-दीड वर्ष तरी जन्मस्थळाचे काम सुरूच राहणार आहे. परिणामी, यंदाही महाराजांची जयंती अपूर्णावस्थेत असलेले जन्मस्थळ आणि रिकाम्या इमारतीत साजरी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)