शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग ; रोज २०० वर कॉल्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

कोल्हापूर : गेला महिनाभर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होऊ लागली आहे, गेल्या एप्रिल महिन्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना नेण्यासाठी ...

कोल्हापूर : गेला महिनाभर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होऊ लागली आहे, गेल्या एप्रिल महिन्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला कॉल्सही वाढले, त्यामुळे ही रुग्णवाहिका सेवाही आता वेटिंगवर राहू लागली आहे. जानेवारी ते १५ मार्चपर्यंत रुग्णवाहिकेला रोज किमान १५० ते १७५ कॉल्स येत होते. पण त्यानंतर आता कोरोना रुग्णवाढीचा वेगही वाढल्याने ही रोजची कॉल्स संख्या आता दोनशेहून अधिक झाली आहे.

आपत्कालीन वैद्यकीय सुविधेसाठी जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकांची ३६ वाहने धावत आहेत. दि. १ मार्च २०२० ते १ एप्रिल २०२१ या वर्षभरात जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकेने तब्बल १९,७४८ कोरोना रुग़्णांना रुग्णालयापर्यंत पोहोच करण्याची सेवा बजावली. कोविड रुग्णाबरोबरच अन्य रुग्णांनाही या रुग्णवाहिकेतून सेवा पुरवल्या जात आहेत. जिल्ह्यातील सर्वच कोविड रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी १०८ या रुग्णवाहिका धावत आहेत. प्रत्येक रुग्णवाहिकेला रोज किमान ३ ते ५ कॉल्स येत होते. आता कोरोना संसर्ग वाढल्याने आता रुग्णसंख्येतही दिवसागणिक वाढ होत असल्याने आता दि. १५ मार्चनंतर कॉल्सची संख्याही वेगाने वाढली आहे. त्यामुळे १०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग वाढत आहे. कोल्हापूर शहर व उपनगरांसाठी तीन रुग्णवाहिका सेवेत धावत आहेत. या रुग्णवाहिकेसाठी सुमारे १५ टक्के कॉल्स हे कोल्हापूर शहरातून व ग्रामीण भागातून सुमारे ८५ टक्के कॉल्स येत आहेत.

कॉल्स केल्यावर १५ मिनिटात रुग्णवाहिका हजर

कोल्हापूर शहर व उपनगरांसाठी तीन १०८ रुग्णवाहिका धावतात. आवश्यकतेनुसार त्यामध्ये वाढ केली जाते. शहरातून कॉल्स आल्यानंतर अवघ्या १५ मिनिटातच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचेल, तर ग्रामीण भागात रस्त्याच्या परिस्थितीनुसार ही रुग्णवाहिका अवघ्या २० ते ३० मिनिटात घटनास्थळी पोहोचून रुग्णसेवा देत रुग्णाला जीवनदायी ठरत आहे.

ग्रामीण भागातूनही मागणी अधिक

ग्रामीण भागातून सुमारे ८५ टक्के मागणी ही १०८ या रुग्णवाहिकेला आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर अगर कोविड रुग्ण आढळल्यानंतर तेथून काॅल आल्यानंतर अवघ्या २० ते २५ मिनिटात ही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते. गेल्यावर्षीही या रुग्णवाहिकेने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवून अनेकांना जीवनदान दिले आहे.

कोणत्या महिन्यात किती रुग्ण वाहतूक

महिना : कोरोना रुग्ण- इतर रुग्ण

जानेवारी : ०० - १८९७

फेब्रुवारी : ०० - ४६३६

मार्च : ७७२ - ४८२६

पॉईंटर....

- जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिका संख्या : ३६

- एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत रुग्ण वाहतूक : १९,७४८ रुग्ण

- रोज कॉल्स संख्या : १५० (कोरोनापूर्वी)

- मार्चनंतर रोज कॉल्स संख्या : २०० हून अधिक

- जाने. ते मार्च २०२१ रुग्ण वाहतूक : १२१३२ रुग्ण