शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला मुबलक तरीही गर्दी : स्थानिक भाज्याही उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 18:39 IST

CoronaVirus Kolhapur- कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली असून, भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारात भाजीपाल्याची आवक मुबलक होत असल्याने नागरिकांनी गर्दी करण्याची गरज नाही. बाजार समितीत रोज सरासरी तीन हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक होत आहे.

ठळक मुद्देभाजीपाला मुबलक तरीही गर्दी : स्थानिक भाज्याही उपलब्ध बाजार समितीत रोज तीन हजार क्विंटल आवक

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली असून, भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारात भाजीपाल्याची आवक मुबलक होत असल्याने नागरिकांनी गर्दी करण्याची गरज नाही. बाजार समितीत रोज सरासरी तीन हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक होत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदी, मिनी लॉकडाऊनसह इतर कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, यातून जीवनाश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असले तरी भाजीपाला खरेदीसाठी सकाळी व सायंकाळी अक्षरश: झुंबड उडालेली पाहावयास मिळते. कोल्हापूर जिल्ह्यात भाज्यांची आवक चांगली आहे.

उष्मा वाढला असला तरी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज तीन हजार क्विंटल भाज्यांची आवक होते. मंगळवार, गुरूवार, रविवारी तुलनेने भाज्यांची आवक कमी असते. त्याचबरोबर स्थानिक शेतकऱ्यांचा भाजीपालाही सध्या बाजारात येत आहे. कोल्हापूर शहरातील मंडई, चौक, फुटपाथसह विविध ठिकाणी शेतकरी भाजीपाला घेऊन बसलेले असतात. त्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करण्याची गरजच नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्याkolhapurकोल्हापूरMarketबाजार