शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीत उपोषण, बंद

By admin | Updated: May 29, 2015 23:47 IST

नगरपालिकेची मागणी : शासकीय कार्यालये बंद पाडण्याचा इशारा

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथे शासनाने लवकरात लवकर नगरपालिकेची स्थापना करावी, या मागणीसाठी नगरपालिका कृती समितीच्या वतीने शुक्रवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला शहरातील व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने आपापले व्यवहार बंद ठेऊन पाठिंबा दर्शविला. विविध पक्षांच्या सुमारे ३०० हून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.दरम्यान, १५ जूनअखेरपर्यंत शासनाने नगरपालिकेची उद्घोषणा करावी, अन्यथा शहरातील सर्व शासकीय कार्यालये बंद पाडण्याबरोबरच उग्र स्वरूपाची आंदोलने उभारण्यात येतील, असा निर्धार यावेळी कृती समितीच्या वतीने निमंत्रक अमजद नदाफ यांनी व्यक्त केला.हुपरी येथे नगरपालिका अस्तित्वात यावी, यासाठी गेल्या ३० वर्षांपासूनची रौप्यनगरीवासीयांची मागणी आहे. मात्र, शासनाने विविध कारणाने अद्यापपर्यंत नगरपालिकेची उद्घोषणा केलेली नाही. सध्या शहराची लोकसंख्या ६० हजारांपेक्षा अधिक झाली असून, इतक्या मोठ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्यामध्ये ग्रामपंचायत अपयशी ठरत आहे. परिणामी, ग्रामस्थांना अनेक प्रकारच्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. यामुळे नागरिकांनी कृती समितीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या मागणीसाठी शासनाकडे गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला आहे. मात्र, शासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने कृती समितीच्यावतीने शुक्रवारपासून विविध प्रकारच्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली. कृती समितीच्या वतीने गावभागातील जुना बसस्थानक चौकामध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासोा कांबळे, जि. प. समाजकल्याण सभापती किरणराव कांबळे, माजी जि. प. अध्यक्ष नानासोा गाठ, दौलत पाटील, अशोक खाडे, अजित सुतार, सुदर्शन खाडे, उमर नदाफ, गणेश कोळी, मुबारक शेख, प्रवीण कुंभोजकर, प्रतापसिंह देसाई, विनोद खोत, नितीन गायकवाड, डॉ. सुभाष मधाळे, राजेश राठोड, रघुनाथ नलवडे, बाळासोा बडवे, विलास चव्हाण, मनोज पाटील, महेश कोरवी यांच्यासह ३०० हून अधिकजणांनी सहभाग घेतला. या उपोषणाला माजी आमदार राजीव आवळे, आरपीआय जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे, मंगलराव माळगे, संजय चौगुले, आदींनी उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दर्शविला. तसेच आमदार सुजित मिणचेकर, माजी खासदार निवेदिता माने, खासदार धनंजय महाडिक, आदींनी भ्रमणध्वनीवरून उपोषणाला पाठिंबा दर्शविला. (वार्ताहर)