शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

एनडीआरएफची आणखी दोन पथके कोल्हापुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 14:23 IST

कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी देखील पूरपरिस्थिती बाबत शासनाला अवगत केले होते.

कोल्हापूर : प्रत्येकी २२ जवानांची दोन एनडीआरएफची पथके कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी दाखल झाली. एक पथक कोल्हापुरात तर दुसरे शिरोळ तालुक्यातील टाकळी येथे पोहचले.

महाराष्ट्रामध्ये दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संभाव्य पूरस्थिती बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या आपत्ती विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा केली व आवश्यक तेथे सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले, या चर्चेदरम्यान सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर यांना कोल्हापूर जिल्ह्यामधील संभाव्य पुरपरिस्थिती बद्दल विस्तृत माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणखी जादा एनडीआरएफ ची पथके पाठवली जावीत यासाठी आग्रह मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी धरला होता.

धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी, वारणा, व कोयना धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.

 या तिन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवला तर या धरणाखाली येणाऱ्या सर्व नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे, सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेसह जवळपास सर्व नद्याखालील बंधारे पाण्याखाली गेले असून नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडत आहेत,  त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थितीचा धोका संभवतो असे बैठकीदरम्यान राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.

 खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात करिता आणखी जादा एनडीआरएफची पथके  मिळावीत अशी मागणी काल केली होती.  बैठकीनंतर मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यासाठी एनडीआरएफची दोन पथके तातडीने कोल्हापूरकडे रवाना करण्यासाठीचे आदेश आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय येवलकर यांना दिले होते. यावर संचालक येवलकर यांनी एनडीआरएफच्या पुणे येथील प्रमुखांना एनडीआरएफची दोन पथके कोल्हापूरला रवाना करण्याबाबतच्या सूचना दिल्या.

कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी देखील पूरपरिस्थिती बाबत शासनाला अवगत केले होते, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन संचालक येवलकर यांनी वरील आदेश दिले.

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर