शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Local Body Election: हुपरीत दोन आघाड्यांना एकच चिन्ह; अधिकारी, पदाधिकाऱ्यात शाब्दिक चकमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:40 IST

शिटी या एकाच चिन्हावर दोन्ही आघाड्या ठाम

हुपरी : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि.२६) चिन्हे वाटप झाली. यावेळी युवक क्रांती व शिवशाहू आघाडीला एकच शिटी चिन्ह दिल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला. यामुळे गोंधळ निर्माण झाला. मात्र, शिटी या एकाच चिन्हावर दोन्ही आघाड्या ठाम होत्या. आघाडीच्या नेत्यांनी विरोधकांच्या आक्षेपाचा निषेध करीत आंदोलनाचा इशारा दिला. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारी यांनी निर्णय चुकला असल्याची कबुली देत युवक क्रांतीला शिट्टी व शिव शाहू आघाडीला छत्री चिन्ह दिल्याचे जाहीर केले.निवडणूक कार्यालयात सकाळी अकरा वाजता चिन्ह वाटप करण्यासाठी सर्व पक्ष आघाडी व अपक्षांना चिन्ह वाटप करण्यासाठी बोलवण्यात आले होते. यावेळी युवक क्रांती व शिवशाही आघाडी या दोन्ही आघाड्यांना नगराध्यक्षपदासह शिट्टी चिन्ह देण्यात आले होते. यावर उपस्थित असलेल्या कोणत्याही पक्ष, आघाडी अथवा अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतला नव्हता. मात्र नंतर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व उमेदवारांनी या चिन्ह वाटपावर आक्षेप नोंदवला. यावर विचारविनिमय करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता सर्व अपक्ष व पक्षाच्या उमेदवारांना बोलावून वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार शिवशाहू आघाडीला शिटी चिन्ह वाटप चुकीचे झाले आहे ते बदल करण्यात येत असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली मोठ्या प्रमाणात प्रवेशद्वाराजवळ जमाव एकत्र होत निषेध व संविधानाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काहीकाळ तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली. अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णयात बदल करून आघाडीतील युवक क्रांतीला शिट्टी, शिव शाहू आघाडीला छत्री चिन्ह दिल्याचे जाहीर केले. नाईलाजास्तव आघाडीचे कार्यकर्ते मागे फिरले. यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीलाच गोंधळ निर्माण झाल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.अधिकारी, पदाधिकाऱ्यात शाब्दिक चकमक यातून मार्ग काढण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारी, मुख्याधिकारी अजय नरळे, पीआय निंगाप्पा चौखंडे यांच्यासह शिव शाहू व युवक क्रांती आघाडीचे पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चेदरम्यान शाब्दिक चकमक उडाली. कुणाच्या दबावाखाली निर्णय फिरवला असा जाब विचारत सगळेच आक्रमक झाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Local Election: Symbol mix-up sparks clash; officials backtrack.

Web Summary : Symbol allocation errors in the Kolhapur local body election caused disputes between two alliances, leading to verbal clashes and eventual reversals by election officials after protests.