शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या चितेला अग्नी देऊन दिला बारावीचा पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 14:40 IST

दीर्घ आजाराने आईचे निधन झाले. शोकाकुल वातावरणात आईच्या चितेला अग्नी देऊन मुलाला जड अंत:करणाने बारावीच्या परीक्षेला जावे लागले. एकीकडे आई गेल्याचे दु:ख आणि दुसरीकडे आयुष्य घडविणारी परीक्षा अशा द्विधा मन:स्थितीत त्या विद्यार्थ्याला मंगळवारचा इंग्रजीचा पेपर देण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पन्हाळा तालुक्यातील देवाळे गावी ही घटना घडली.

ठळक मुद्देआईच्या चितेला अग्नी देऊन दिला बारावीचा पेपरपन्हाळा तालुक्यातील देवाळे गावातील घटना

कोल्हापूर : दीर्घ आजाराने आईचे निधन झाले. शोकाकुल वातावरणात आईच्या चितेला अग्नी देऊन मुलाला जड अंत:करणाने बारावीच्या परीक्षेला जावे लागले. एकीकडे आई गेल्याचे दु:ख आणि दुसरीकडे आयुष्य घडविणारी परीक्षा अशा द्विधा मन:स्थितीत त्या विद्यार्थ्याला मंगळवारचा इंग्रजीचा पेपर देण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पन्हाळा तालुक्यातील देवाळे गावी ही घटना घडली.रंजना तानाजी पाटील (वय ४८) या काही वर्षांपासून दीर्घ आजाराशी झुंज देत होत्या. आठ दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांनी अन्नपाणी सोडले होते. त्यांचा मुलगा श्रीनाथ हा देवाळे महाविद्यालयामध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकतो. सध्या त्याची परीक्षा सुरू आहे.

अभ्यास करून तो आईची सेवा करीत असे. सोमवारी (दि. १७) रात्री उशिरापर्यंत तो अभ्यास करीत बसला होता. मंगळवारी सकाळी आईला उठविण्यासाठी गेला असता ती निपचित पडली होती. तिचा श्वास बंद होता. ती देवाघरी गेल्याचे समजताच नातेवाइकांनी टाहो फोडला.

आईच्या चितेला अग्नी देऊन तो पुन्हा जड अंत:करणाने परीक्षेला गेला. आईच्या विरहाचे अश्रू टिपत त्याने जड मनाने इंग्रजीचा पेपर दिला. श्रीनाथवर कोसळलेले दु:ख पाहून परिसरातील लोकांना गहिवरून आले. रंजना पाटील यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, जावई असा परिवार आहे. 

 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीkolhapurकोल्हापूर