शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तेरा दिवसांत १४०० जणांचा प्रवास; मुंबई-कोल्हापूर विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:39 IST

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली ‘मुंबई-कोल्हापूर’ विमानसेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्या ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली ‘मुंबई-कोल्हापूर’ विमानसेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्या दिवसापासून आजअखेर १३ दिवसांमध्ये एकूण १४०० जणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक, भाविक आणि पर्यटकांचा समावेश आहे.केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत ट्रू-जेट कंपनीने ७० आसनी विमानाच्या माध्यमातून मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू केली. मुंबईहून दुपारी साडेबारा वाजता सुटणारे विमान कोल्हापुरात दीड वाजता येते. येथून दुपारी एक वाजून ५० वाजता निघणारे विमान मुंबईत दुपारी दोन वाजून ५० मिनिटांनी पोहोचते. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशी आठवड्यातील पाच दिवस ही सेवा सुरू आहे. या विमानसेवेची वेळ दुपारची असली, तरी प्रवाशांचा तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोज सरासरी १०० जण ‘मुंबई-कोल्हापूर-मुंबई’ मार्गावर प्रवास करतात. त्यामध्ये ५० टक्के प्रवासी हे कोल्हापूरचे असून उर्वरित इचलकरंजी, सांगली, कºहाड, सातारा, आदी परिसरांतील आहेत. काही प्रवासी कोल्हापूरहून अहमदाबाद, इंदोर, हैदराबाद या राज्यांसह जपान, युरोपीयन देशांची कनेक्टिंग फ्लाईट घेत आहेत. तिरूपती-कोल्हापूर-हैदराबाद आणि हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गांवरील सेवांपाठोपाठ मुंबई-कोल्हापूर मार्गावरील सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवासी आणि विमान कंपन्यांसाठी आवश्यक असणाºया सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे.